Ticker

6/recent/ticker-posts

Bhartiya sanvidhan l Amrit mahotsav l भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हाच खरा स्वातंत्र्य दिन- सुरज पि. दहागावकर विचारज्योत फाऊंडेशन तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा...



चंद्रपुर: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे दि. १३-१५ आगस्ट दरम्यान विदर्भामध्ये विविध ठिकाणी 'हर घर तिरंगा' मोहीम राबविण्यात आली. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाऊंडेशन तर्फे चंद्रपुर येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज पि. दहागावकर यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारतभर साजरा होत असेल परंतु आजही देशात गरिबी, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या प्रश्नांकडे शासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे आणि भारतीय संविधानाची ज्या दिवशी शंभर टक्के अंमलबजावणी होईल तोच दिवस खरा स्वातंत्र्य दिन असेल असे मत व्यक्त केले.


संस्थेचे सचिव मुन्ना तावाडे यांनी विचारज्योत फाऊंडेशन तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन लवकरच करण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी विचारज्योत फाऊंडेशनचे सुरज पि. दहागावकर, मुन्ना तावाडे, इंजि. नरेंद्र डोंगरे, तृप्ती साव, वामनराव मोडक, रमेश मोडक, प्रदीप गुरनूले, स्पर्श ढाले, आशिष दहागावकर आदी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments