Ticker

6/recent/ticker-posts

Gadachiroli l govansh l कत्तलखान्यात जाणाऱ्या ५२ गोवंशाची सुटका : दोन ट्रकसह मुद्देमाल जप्त – गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई



जनवार्ता भारत डॉट कॉम
गडचिरोली, १४ ऑगस्ट : जिल्ह्यातील तसेच सीमावर्ती महाराष्ट्र भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडून गोवंश खरेदी करून मालवाहू वाहनामध्ये अपुऱ्या जागेत कोंबुन दाटीवाटीने व निदर्यतेने भरून कत्तली करीता नेत असतांना गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत ५२ गोवंशांना मुक्त करत दोन ट्रकसह मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, काल १३ ऑगस्ट रोजी गोवंश ट्रकमध्ये कोंबुन पेंढरी मार्गे नेत असल्याच्या प्राप्त गोपनिय माहितीनुसार पोमके गट्टा (फु.), पोमके चातगाव, पोस्टे कारवाफा, पोस्टे धानोरा इत्यादी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान पोमके गट्टा (फु.) येथील बॅरिकेटला धडक मारून वाहने भरधाव वेगाने निघुन गेले. परंतु पोमके चातगाव येथे नाकाबंदी असल्याने व योग्य समन्वयाने चातगाव येथे कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या दोन ट्रक अडवण्यात आले व तपासणी केली असता ट्रक मध्ये असलेल्या ५२ जनावरांची मुक्तता केली. याप्रकरणी गोवंश वाहतुक करणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई सुरू असून, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

सदर कार्यवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी, प्राणहिता अनुज तारे सा., यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी मयुर भूजबळ यांचे नेतृत्वात सपोनि संतोष पाटील, पोउपनि प्रकाश चौधरी पोमके चातगाव तसेच पोहवा / अमोल धात्रक, पोहवा / शंकर मट्टामी, पोना / सुधाकर दंडिकवार, पोशि शरद जाधवर, पोशि पंकज नाडमवार, पोशि प्रभाकर राठोड यांनी केली.

Post a Comment

0 Comments