Ticker

6/recent/ticker-posts

pur paristhiti Gambhir l pombhurna l आज आठव्या दिवशीही जूनगाव इतर गावांच्या संपर्का बाहेर, पूर परिस्थिती गंभी


पोंभुर्णा प्रतिनिधी
तालुक्यातील जुनगाव हे गाव बहुचर्चित आहे. याला कारणही तसेच आहे. या गावाच्या सभोवताल वैनगंगा नदीने आधीपासूनच वेढा दिलेला आहे. पावसाळ्यात वैनगंगा नदीला पूर आल्यानंतर या गावचा संपर्क वारंवार खंडित होत असतो. मागील दिवसात या गावचा संपर्क एक आठवडाभर खंडित होता. या कालावधीत एका तरुणाचा सर्पदंशाने जीव गेला. तसेच दिनांक 14 ऑगस्ट रोजी लिलाबाई सुकलाल चुधरी या महिलेला सर्पदंश झाला. 


पुरामुळे अनेक समस्या या गावात निर्माण झाल्या असल्या तरी, जिल्हा व तालुका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केला आहे. वारंवार या गावात आरोग्य पथक पाठवण्याची मागणी करण्यात आली परंतु प्रशासनाच्या कानावर जू धावली नाही.


 त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गावात जिल्हा परिषदेची शाळा असून येथे एक ते सात वर्ग आहेत. मात्र या पूर परिस्थितीत शिक्षक वर्ग मुख्यालयी न राहता 25 ते 30 किलोमीटर अंतरावर राहत असल्यामुळे शाळेवरही आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. 


शाळेमध्ये सर्व काही अलबेल चाललेले आहे. 13 ऑगस्ट रोजी या शाळेवर केवळ दोन शिक्षकांची उपस्थिती होती. 13 ऑगस्ट ला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांची वास्तविक रॅली काढून "हर घर तिरंगा" या अभियानाची माहिती गाववासियांना देणे आवश्यक होते. परंतु तसे काही घडलेले नाही. 


आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असताना सुद्धा शिक्षकांची अनास्था पाहायला मिळाली. शिक्षकांना मुख्यालय राहणे बंधनकारक करावे अन्यथा पूर्ण शाळेला कुलूपच ठोकून देऊ असा इशारा वजा विनंती पंचायत समिती प्रशासनाकडे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे. तालुका प्रशासनही गंभीर नसल्यामुळे अनेक खेडेगावात अनेक समस्या उद्भवत असल्याचा आरोपही जीवनदास गिराम यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments