चंद्रपूर (सावली) :-
पंचायत समिती सावली अंतर्गत ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले . दि. १३ ऑगष्ट रोजी नियोजित वेळेनुसार सकाळी ८.१५ मा.प्रशासक तथा गट विकास अधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.
त्यानंतर विविध प्रजातीचे वृक्षारोपण करून वृक्ष आम्हा सोयरे वनचरे या युक्ती प्रमाणे निसर्ग संवर्धन हि काळाची गरज असुन भविष्यमयीन निसर्गाचे समतोल अबाधित राखायचं असल्यास आज प्रत्येकांनी वृक्षारोपणांचा छंद बाळगला तर येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल असे मत गट विकास अधिकारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले.
दि. १४ आगस्ट रोजी ठराविक वेळेत ध्वजारोहण कार्यक्रम आटोपून पंचायत समिती अंतर्गत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दरम्यान कार्यरत अधिकारी तथा कर्मचारी वृदांची व उपस्थित वर्गांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अधिकारी व कर्मचारी जनसामान्यांन पर्यंत शासकीय सेवा अविरतपणे देत असताना स्व:तच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची सवड नसते त्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगमय अबाधित राहावे अशी सदिच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
आज ७५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत प्रशासक तथा गट विकास अधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर परिसंवाद कार्यक्रम, देशभक्ती पर गितगायन स्पर्धा, शालेय विद्यार्थी व महिला बचत गटाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अशा प्रकारे तीन दिवसीय विविध प्रकारचे उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करुन मोठ्या थाटामाटात "७५ व्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव " हर घर तिरंगा कार्यक्रमाअंतर्गत पंचायत समिती सावली च्या वतीने देशभक्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.














0 Comments