Ticker

6/recent/ticker-posts

आत्ताची ब्रेकिंग न्यूज पुराच्या प्रवाहात बैल जोडी गेली वाहून! जुनगाव येथील धक्कादायक घटना#pombhurna #chandrapur



तालुका प्रतिनिधी
जुनगाव हे गाव ९ ऑगस्ट पासून वैनगंगा नदीच्या पुराच्या वेढ्यात आहे. या पुरामुळे वेळेवर उपचार अभावी एका तरुणाचा १० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.
आज शुक्रवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी कुमार मारुती दुधनवार या शेतकऱ्याचे दोन्ही बैलपुरामध्ये वाहून गेल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असून त्याला ताबडतोब शासनाने मदत करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल पाल व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments