नेमकं काय झालं?
मंगळवारी सकाळी हे हत्याकांड घडलं. अत्यंत शुल्लक कारणावरुन आजी आणि नातवात भांडण झालं होतं. या भांडणाचा राग नातवाच्या डोक्यात केला. त्याने संतापाच्या भरात आजीवर हातातील कड्यानेच वार केला. यात आजीच्या उजव्या डोळ्या जवळ गंभीर जखमी झाली. नातवाने हातात घातलेलं हे कडं लोखंडी होतं. त्यामुळे त्याने घातलेला घाव किती जबर होता, याची निव्वळ कल्पना केलेली बरी.
नातवाच्या जीवघेण्या घावाने आजी गंभीर जखमी झाली. जागीच गंगाबाई गुरव यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने या घटनेबाबत कळताच घटनास्थळ गाठलं आणि गंगूबाई गुरव यांचा मृतदेह पुढील पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवला.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा-साडे सहा वाजण्याच्या दरम्यान, हे हत्याकांड घडलं. सध्या पुढील तपासणीआधी पोलिसांना सगळ्यात आधी पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी मारेकरी नातवालाही ताब्यात घेतलं असून पुढील तपासही केला जातोय. आजी-नातवाच्या नात्याला काळी फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संतपात व्यक्त केला जातोय. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढे नेमकी नातवावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.



0 Comments