Ticker

6/recent/ticker-posts

पूर येवो न येवो जुनगाव येथील अनेकांच्या घरात साचत असते पावसाचे पाणी: शिवसेना उपतालुकाप्रमुखाने केली सर्व घरांची पाहणी



पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
पावसाळ्यात बहुतेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवते आणि या परिस्थितीत अनेकांच्या घरात पाणी शिरते यामुळे अनेक नागरिकांना जिवाचा धोका पत्करून जीवन कंठावे लागते. हे सत्य असले तरी पूर आला तरी जूनगाव येथील काही गरिबांच्या घरात पाणी घुसते आणि नाही आला तरी पावसाचे पाणी घरात शिरते.
     7 जुलैपासून तालुक्यात पावसाने कहर माजविला आहे. त्यामुळे तालुक्यातील वैनगंगा नदी, उमा नदी, वर्धा नदी व नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावे पुरात वेढलेली होती. तालुक्यातील जुनगाव येथील अनेक शेतकऱ्यांची शेती पिकाची अतोनात नुकसान झालेली आहे. शेतकऱ्यांच्या शेत पिकाची नुकसान पुरामुळे होत असते, मात्र पूर असो की नसो पाऊस आला तर काही लोकांच्या घरात मात्र पूर येतो. जुनगाव येथे ही परिस्थिती उद्भवली आहे.विठोबा हनुमंत गोहणे, मारुती बोनुजी चुधरी, भास्कर लवंगुजी गेडाम या नागरिकांच्या घरात पाऊस आला तर एक दीड फूट पाणी साचते. घरात पाणी साचून असताना बाजा- खाटा टाकून, सर्व धोके पत्करून हे नागरिक आपलं जीवन कंठत आहेत. आपल्या खाली पाणी व खाटेवर वरती कुटुंब अशी परिस्थिती या काही कुटुंबांची झाली आहे. या कुटुंबांची याच वर्षीची ही व्यथा नाही आहे. दरवर्षी पावसाळा आला तर यांना रात्र जागून पाणी झोकल्या शिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र अशा लाभार्थ्यांना, गरीब व गरजू लोकांना वगळून ज्यांना मोठमोठे घर आहेत ज्यांचे कडे अमाप शेती आहे,त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला असल्याचा आरोप या नागरिकांनी केलेला आहे. स्वर्गीय चिरकुटा संदोकर यांच्या विधवेच्या घरात सभोवतालच्या घरातील पाण्यामुळे ओलावा निर्माण होऊन त्यांनाही वास्तव्य करणे कसरतीचे ठरत आहे. शीला विश्वनाथ झबाडे, या विधवा महिलेच्या घरात सुद्धा पावसामुळे राहणे कठीण झाल्यामुळे त्या महिलेने घर सोडून माहेरी आसरा घेतला आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने आपती व्यवस्थापनाने आज दिनांक 24 जुलै रोजी तलाठी च्या मार्फतीने या सर्व घरांचा सर्वे होणार असल्याची माहिती पोलीस पाटील कान्होजी भाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे गरजू व संकटात सापडलेल्या नागरिकांना प्रशासन दिलासा देईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या सर्व घरांचा मोका पंचनामा करून, व मोठ्या प्रमाणात झालेल्या शेत पिकांची पाहणी करून शासनाने त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments