Ticker

6/recent/ticker-posts

गोवार्धन ग्रामपंचायतीत अनेक योजनांच्या निधित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप *▪️निधिचा अफरातफर, अपहार करणारे तत्कालीन सरपंच मोकळेच



जुनगाव |प्रतिनिधी
 जिल्हातील मुल तालुक्यातील गोवार्धन हे गाव राजकीय दृष्टया संवेदनशील व तालुक्याचे शेवटचे टोक आहे. मात्र या गोवार्धन ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंचानी अनेक योजनेतील निधिचा अपहार, आर्थिक व्यवहारात अफरातफर व वित्तीय अनियमितता करुन आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे ग्रामपंचायत सदस्य काजल लाकडे व सुनील काळे यांनी तक्रार केली. त्या तक्रार अनुषंगाने संवर्ग विकास अधिकारी यांनी प्रथमदर्शनी चौकशी केली. त्या चौकशी अहवाल नुसार ग्रामपंचायत मधील अनेक योजनेत धांधली झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी त्या चौकशी अहवाल नुसार दोषी असणाऱ्या कल्पना खोब्रागडे, युवराज उमक व तुळजाबाई जाधव या तत्कालीन सरपंचाना कारणे दाखवा नोटीस बजावून आपले म्हणने आठ दिवसात कळवावे असे कळविले. त्यामूळे तत्कालीन सरपंचानी आपली मते सादर केलीत. परंतु गेल्या अनेक दिवसापासून भ्रष्टाचार झाल्याचे दिसत असून सुद्धा तत्कालीन सरपंचावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याचे पाणी कुठे मुरतेय याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोध घेऊन निधिचा अपहार, व अफरातफर करुन मोकाट असणाऱ्या तत्कालीन सरपंचावर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी तक्रार कर्त्यानी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत रेटून धरली आहे.

*१४ वा वित्त आयोग निधिचा खर्च नमुना ५ प्रमाणकात नोंद नाही*


१४ वा वित्त आयोगाचा निधी खर्च करतांना त्याची नोंद नमुना ५ प्रमाणकात घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र ५ प्रमाणका प्रमाणे दिनांक ०१.०५.२०१८ ला सुरवातीची शिल्लक ६८४९२/- रुपये इतकी होती. त्यानंतर १४ वा वित्त आयोग अंतर्गत शासनाकडून वेळोवेळी आलेले अनुदान व त्यावरील मिळालेले व्याज असे ८०५३००/- इतका निधी जमा झाला होता. हा निधी खर्च करतांना शासनाने ठरवून दिलेल्या मंजूर आराखड्यानुसार खर्च करावा लागतो. मात्र हा लाखो रुपयाचा खर्च प्रमाणका शिवाय करण्यात आला.

*स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निधितही अफरातफर*


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नमुना ५ ला नोंद असलेल्या प्रमाणका नुसार ज्या लाभार्थ्यांना वैयक्तीक शौचालय बांधकाम पुर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेश द्वारे लाभ देण्यात आला. मात्र सदर योजनेचे खाते बँक खाते बँक ऑफ इंडिया बेंबाळ येथे असतांना त्या खात्यात जमा न करता जिल्हा मध्यवर्ती बँक मुल शाखेत असलेल्या सामान्य निधिच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. व त्या निधितून कोणत्या लाभार्थ्यांना लाभ दिला किंवा कोणाचे बांधकाम पुर्ण झाले या खात्री होत नसून प्रमाणका सोबत मंजूर लाभार्थ्यांची यादी व बांधकाम पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांची यादी संलग्न केलेली नाही. त्यामुळे सदर लाभ लाभार्थ्यांना मिळाला की नाही याची खात्री होत नसल्याने या स्वच्छ भारत मिशन योजनेतील निधित मोठी अफरातफर झालेली आहे.


जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत भवन व स्मशानभूमी बांधकाम सौंदर्यीकरण २०,०००००/- आणि अनुषंगिक कामाकरिता १०,०००००/- निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे या कामाची ई-निविदा प्रसिद्ध करुन एल-१ असलेल्या एकाच कंत्राटदाराला दोन्ही कामाचे आदेश देण्यात आले. या दोन्ही कामाचे मुल्यांकन मिळून ७५४४८६/- इतकी रक्कम मोजमाप पुस्तिकेत नोंद आहे. मात्र या कामाचे पुर्ण देय कंत्राटदाराला न देता उर्वरित निधी सेल्फ व इतर व्यक्तिस देण्यात आला. त्यामुळे या योजनेतील उर्वरित देण्यात आलेला व काढलेला निधी कोणत्या कामासाठी काढण्यात आला. याची नोंद जनसुविधा योजनेच्या रेकार्ड पुस्तिकेत उपलब्ध नाही. त्यामुळे या जनसुविधा योजनेत मोठा अपहार झालेला आहे.

Post a Comment

0 Comments