Ticker

6/recent/ticker-posts

संततधार पावसामुळे बेंबाळ येथील वाढई यांचे घर कोसळले: नुकसान भरपाई देण्याची मागणी



दुर्योधन घोंगडे, मुल:तालुक्यातील बेंबाळ येथील विट्ठल वाढई आणि परशुराम वाढई यांचे राहते घर पडल्याने हजारो रूपयांचे नुकसान झालेले असुन शासनाने कुटुंबियाना आर्थीक मदत करावी अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.


मूल तालुक्यातील मौजा बेंबाळ येथील वॉर्ड क्र 3 मधील रहिवासी विठ्ठल गजानन वाढई व परशराम विठ्ठल वाढई यांचे घर शुक्रवारी रात्रौ 2 वाजता दरम्यान सततधार पावसामुळे पडले, यावेळी घरात कुटुंबातील सहा सदस्य राहात होते मात्र सुर्देवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु मोठया प्रमाणावर आर्थीक नुकसान झालेली आहे. वाढई यांची आर्थीक परिस्थिीत अत्यंत बिकट असुन राहण्यासाठी घर सुध्दा बांधु शकत नसल्याने मातीच्या घरात राहुन जिवन जगत आहे, शासनाकडे घरकुलासाठी वारंवार अर्ज करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाढई यांनी केला आहे.

गरीब आणि गरजु नागरीकांना स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरकुलाचा लाभ दिल्या जात नसल्याने अनेक गरीब नागरीक कुटुंबाचा जिव मुठीत घेवुन जिवन जगत आहेत. यामुळे शासनाने बेंबाळ येथे सततधार पावसामुळे पडलेल्या घरांची मौका चौकशी करून आर्थीक मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments