चंद्रपूर : नुकत्याच पार पडलेल्या सेवा सहकारी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत काॅंग्रेस समर्थीत आघाडीने बहुतांश संस्थेवर एकहाती सत्ता मिळविल्याने तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्यें उत्साहाचे वातावरण पसरले असुन विरोधी पक्षात सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापीत करु शकले नाही त्यामुळे विरोधी गटात माञ अस्वस्थता दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची अर्धी भिस्त सहकार क्षेत्रावरच अवलंबून असते. कारण सहकार क्षेत्राचे सर्व सभासद शेतकरी असतात. मुल तालुक्यात झालेल्या सेवा सहकारी व विविध कार्यकारी संस्थेच्या सतरा पैकी मूलच्या विविध कार्यकारी संस्थेवर अध्यक्ष संदीप कारमवार,उपाध्यक्ष अरविंद बोरूले, बेंबाळ अध्यक्ष विकास सिडाम, उपाध्यक्ष मदनकुमार उराडे, भेजगांव रुमदेव गोहणे, उपाध्यक्ष अंगिरस चलाख, नवेगांव भुजला अध्यक्ष सुमित आरेकर, उपाध्यक्ष देवराव झाडे, फिस्कुटी अध्यक्ष अनिल निकेसर, उपाध्यक्ष नितीन आगडे, चिखली अध्यक्ष लहुजी कडस्कर,उपाध्यक्ष नीलकंठ मेश्राम, चिरोली अध्यक्ष दिवाकर कामिडवार, उपाध्यक्ष बापूजी मडावी, सुशी दाबगांव अध्यक्ष किशोर घडसे, उपाध्यक्ष जोगेशवर घोंगडे, राजगड अध्यक्ष प्रदीप कामडे उपाध्यक्ष तुळशीराम शेंडे, गडीसुर्ला अध्यक्ष घनश्याम येनूरकर, उपाध्यक्ष ललित मोहूर्ले, जुनसुरला अध्यक्ष गणेश खोब्रागडे, उपाध्यक्ष मुखरु कोमावार, चांदापूर, अध्यक्ष अनिल मुणगेलवार उपाध्यक्ष अजय गुज्जनवार, डोंगरगांव, अध्यक्ष मधुकर मुंगमोडे, मारोडा अध्यक्ष रितेश जिडगीलवार, उपाध्यक्ष नेताजी वाढई, मूल येथील प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी धनंजय चिंतावार, उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी, मंडळासोबतचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुका पार पडल्या. नांदगावातही कांग्रेस बहुमताने निवडून आली.१७ पैकी जुनासुर्ला आणि चांदापूर या दोन संस्थेचा कार्यकाल डिसेंबर पर्यंत आहे. त्यामूळे शासनाच्या आदेशान्वये सध्या १५ संस्थेच्या निवडणुका घेण्यांत आल्या. झालेल्या १५ सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे वर्चस्व अबाधीत ठेवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात काॅंग्रेस पक्षाने आघाडया निर्माण केल्या. आघाडयांमध्यें सर्वसमावेशक उमेदवारांची निवड आणि रणनितीचा वापर करून काँग्रेस समर्थीत लढवलेल्या निवडणुकीत पंधरा पैकी चवदा संस्था काबीज करता आल्या. केवळ राजोली येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेस समर्थीत आघाडीला ६ जागांवर विजय संपादन करता आला, भाजपा समर्थीत आघाडीने या ठिकाणी ७ जागांवर विजय प्राप्त केला. राजोली वगळता मूल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि प्राथमिक सेवा सहकारी संस्थेशिवाय तालुक्यातील बारा सेवा सहकारी संस्थेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले. सतरा पैकी जुनासुर्ला आणि चांदापुर या दोन सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका डिसेंबर मध्यें होणार असल्या तरी सध्यास्थितीत या दोन्ही संस्थेवर काॅंग्रेस समर्थीत संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यामूळे आज तालुक्यातील सहकार क्षेत्रात काॅंग्रेसचे वर्चस्व दिसून आले.
भविष्यात होणा-या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील काॅंग्रेसवीर आज तयारीत असल्याची चर्चा आहे. सतरा पैकी एक असलेल्या नांदगांव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे दोन गट आमने सामने उभे राहीले परंतू याही ठिकाणी काॅंग्रेसच्या संतोष रावत समर्थीत उमेदवारांनी काॅंग्रेसच्या दुसऱ्या गटाच्या उमेदवारांना धुळ चारत पायचीत केले. तर डोंगरगांव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकतेची मोट बांधत विरोधकांचा पराभव केल्याने याही ठिकाणी काॅंग्रेसच विजयी झाली, झालेल्या सहकार क्षेत्रातल्या निवडणुकीत मुल तालुक्यात कांग्रेस जिवंत ठेवणारे काँग्रेसचे नेते संतोषसिंह रावत व त्यांच्या समर्थकांनी अहोराञ परीश्रम घेतले आहे. हे कुणीही नाकारु शकत नाही. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर बँनरवर झळकणारे, निवेदन देणारे, नेत्यांच्या भेटी सोबतच त्यांच्या अवतीभोवती घुटमळत स्वतःला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समजणारे नेते व त्यांचे समर्थकांचा माञ झालेल्या निवडणुकीत त्यांचा चेहराही दिसला नाही. भाजपाच्या वर्चस्वात असलेल्या विधानसभा क्षेत्रातील मूल तालुक्यात काँग्रेसच्या एकट्या संतोषसिंह रावत गटाने विरोधकांचा सामना केला.
तालुक्याच्या राजकारणात पंचायत समिती आणि नगर परीषदेवर वर्चस्व गाजवतांना माञ सहकार क्षेत्रात भाजपाला पाहिजेे त्या प्रमाणात आघाडया निर्माण करता न आल्याने काॅंग्रेसने सहकार क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापीत केले. त्यामूळे स्थानिक काॅंग्रेस गटात जोर संचारला असून विरोधक मात्र काहीसे अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. पुढे नगर परिषद, जी.प. पं. स. निवडणुकीत भाजप कांग्रेस च्या संघर्षात कोण मुसंडी मारेल याची जनता वाट बघत आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे तालुका कांग्रेस, युवक कांग्रेस,महिला कांग्रेसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून शेतकरी मतदारांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार तालुका अध्यक्ष घनश्याम येनूरकर, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, संदीप कारमवार, अखिल गॅंगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे,दशरथ वाकुडकर, दीपक वाढई,हिमानी वाकुडकर, पवन निलमवार, गुरुदास चौधरी,रुपाली संतोषवार, सुनील शेरकी,रुमदेव गोहणे,शांताराम कामडे,राजू पाटील मारकवार, सुनील गुज्जनवार, पुरुषोत्तम वासेकर,बंडू गुरनुले, पुल्लकवर यांचेसह ग्रामीण कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.



0 Comments