Ticker

6/recent/ticker-posts

*लाचखोर वनपाल अडकला एसीबीच्या जाळ्यात*



चंद्रपूर (प्रतिनिधी) 
पाथरी वनउपक्षेत्रातील वनपाल वासुदेव लहानुजी कोडापे यांना गुंजेवाही येथील तक्रारदारकडून १ लाख रुपयांची लाच घेताना नागपूर येथील लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे.
गुंजेवाही येथील शेतातील सागवानी लाकूड वाहतुकीकरिता तक्रारदाराने वाहतूक परवाना (टीपी) मागितली परंतु पाथरी येथील वनपाल कोडापे यांनी १ लाख २ हजार रुपये लाचेची मागणी केली. १ लाख रुपये देण्याची तडजोड केली परंतु तक्रारदारास न पटल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार दाखल केली. दिनांक ३ जूनला रात्री शासकीय निवासस्थानी १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपयुक्त राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूरचे अविनाश भामरे यांचे मार्गदर्शनात श्रीमती शिल्पा भरडे व सहकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली व कोणीही लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.


Post a Comment

0 Comments