Ticker

6/recent/ticker-posts

पोंभूर्णा न.पं.मध्ये रमाई आवास घरकुल योजनेचे १ कोटी २५ लक्ष चारवर्षापासून पडून- लाभार्थ्यांना लाभ देण्यास नगर प्रशासन असमर्थ अर्ज कपाट बंद- दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यावर कारवाई करुन ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा- विरोधीपक्ष गटनेता आशिष कावटवार यांची विभागीय प्रशासन अधिकारी यांच्या कडे तक्रार-




पोंभूर्णा दि.४ जुन 

शहरी भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत १ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी घरकुलांसाठी २०१८ वर्षी प्राप्त झाला खरा, मात्र चारवर्षापासून हा निधीच खर्च झाला नसल्याने लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुल मिळावे, या उद्देशाने आवास योजना राबविली जाते. मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जातो. २०१७-१८ या वर्षापासुन पोंभूर्णा नगर पंचायतला १०० घरकुल लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी १ कोटी २५ लक्ष रुपये नगर पंचायतला शासनाने दिले होते. मात्र चार वर्षापासुन यासंदर्भात कारवाई झाली नाही.लाभार्थीचे अर्ज धूळ खात कपाट बंद ठेऊन या योजने पासुन लाभार्थीना वंचित ठेवणार्या अधिकारी-कर्मचारी यांच्या वर कठोर कारवाई करुन त्याच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विभागीय आयुक्त नगर प्रशासन विभाग नागपुर यांच्या कडे विरोधी पक्षगटनेता आशिष कावटवार यांनी केली आहे.
रमाई घरकुल योजना साधी व सरळ असताना परिणामी एकाही लाभार्थ्याच्या खात्यावर छदामही जमा झाला नाही. त्यामुळे निधी मिळूनही लाभार्थ्यांना घरकुल मात्र मिळाले नाही.
प्रशासकीय उदासीनतेमुळे शहरातील मागासवर्गीय लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. एका लाभार्थ्याला घरकुल बांधण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१८-१९ मध्ये १०० घरकुलांसाठी १ कोटी२५ लक्ष रुपये नगर पंचायतकडे जमा झाले. विशेष म्हणजे त्यापूर्वीच्या उद्दिष्टातील रक्कमही नगर पंचायतकडेच शिल्लक आहे. त्यामुळे रमाई घरकुल योजनेअंतर्गत नगर पंचायतच्या खात्यावर त्यावर चार वर्षाची व्याजेसह तब्बल १ कोटी ४० लक्ष २० हजार रुपयांची रक्कम जमा असताना लाभार्थ्यांची साधी निवडही झाली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊनही तो संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसेल तर योजना कशी यशस्वी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. चार वर्षापासून निधी पडून असल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 
 या गंभीर प्रश्णाकडे सत्ताधारी पदाधिकरी,मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने लाभार्थीना वंचित रहावे लागत आहे.
लक्ष दिले असते तर लाभार्थीना लाभ मिळाला असता.असाही जनसामान्यात सुर उमटत आहे.
   
पोंभुर्णा नगर पंचायतची रमाई घरकुल योजनेची अखर्चित निधी नागभीड नगरपरिषद ला मिळावे म्हणून नागभीड येथील मुख्याधिकारी यांनी मागणीचा अर्ज केला आहे. त्यामूळे पोंभूर्णा नगर पंचायत मधिल रमाई घरकुल योजनेची निधी तर जाणार नाही ना असा ही प्रश्ण पडत आहे.त्यामूळे या योजनेत लाभार्थीना वंचित ठेवणार्या दोषी अधिकारी-कर्मचार्यावर कारवाई करुन दोन दिवसात ह्या योजनेचा लाभ लाभार्थीना देण्यात यावा अन्यथा जनअंदोलन उभारण्याचा इशारा नगर पंचायत गटनेता आशिष कावटवार यांनी निवेदन द्वारे दिला आहे.


Post a Comment

0 Comments