जनवार्ता भारत डॉट कॉम
भंडारा : प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने हल्ला करुन एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना तुमसर येथील देव्हाडी मार्गावरील हाॅटेल प्रसाद समाेर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. खुनाचा हा थरार हाॅटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला.
सचिन गजानन मस्के (३४) रा. शिवाजी नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. तुमसर शहरातील देव्हाडी मार्गावरील हाॅटेल प्रसादमध्ये सचिनसह तीन ते चारजण जेवन करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले हाेते. जेवन आटाेपून हाॅटेलच्या बाहेर आले तेव्हा क्षुल्लक कारणावरुन वाद उघडून सचिनच्या पाठीवर व पाेटावर तिक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. त्यात ताे जागीच ठार झाला. सचिन मृत्युमुखी पडल्याची खातरजमा हाेताच सर्व आराेपींनी तेथून पळ काढला. या घटनेचा थरार हाॅटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सचिनला संपविण्याचा रचला कट
प्रेमप्रकरणामुळे सचिनला संपविण्याचा प्रयत्न आराेपी करीत हाेते. शुक्रवारी त्याच्यासाेबतच हाॅटेलमध्ये जेवन करुन त्याचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी प्रेम प्रकरणातूनच तुमसर शहरात एका तरुणाची हत्या झाली हाेती.



0 Comments