Ticker

6/recent/ticker-posts

खाकी *सेट ?*्अवैद्य दारु विक्री चालतेय *थेट* ▪️चामोर्शी शहर व तालुक्यात खुलेआम अवैध दारूचा गोरखधंदा


               प्रातिनिधिक छायाचित्र
जिवनदास गेडाम
जनवार्ता भारत डॉट कॉम
गडचिरोली : तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात अवैध दारू विक्री व्यवसाय खुलेआम जोमात सुरू आहे. अवैध दारू विक्री व्यवसायिक सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागासह शहरात मोठ्या प्रमाणावर खुलेआम दारू विक्री सुरू आहे. मात्र चामोर्शी पोलीस या अवैद्य दारु विक्री करणाऱ्या व्यावसाईकांशी मोठे हितसंबध ठेऊन हप्ते खोरीतून अवैद्य दारु विक्रीला चालना देत असल्याचे वास्तव चित्र पाहायला मिळते आहे. त्यामुळे *खाकी सेट ? अवैद्य दारु विक्री चालतेय थेट* असे म्हणायला वावगे ठरणार नाही.
 चामोर्शी पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या भेंडाळा, लखमापूर बोरी, सगणापूर, बल्लू, वाकडी, घारगाव, दोटकुली, मुरखळा, वाघुली, कान्होली, हळदी या ग्रामीण भागासह स्थानिक चामोर्शीत सुद्धा देशी दारू पासून तर विदेशी दारू पर्यंत सर्वच प्रकारची दारू प्रतिबंधित परिसरात सर्रास मिळत आहे. या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे. या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून कधीच अडविली जात नाहीत.पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नाही. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागतांना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात. जप्त केलेल्या मालाची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.
*भर चौकात दारुची होते अवैद्य विक्री* 
अवैध दारु विक्रीचा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू असून वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाला सूचना असूनही या प्रकाराकडे लक्ष दिले जात नसल्याने यावर वरदहस्त नेमका कुणाचा? असा सवाल ग्रामवासीयांतर्फे विचारला जात आहे. चामोर्शीत प्रवेश करताना तीनही रस्त्यांवर व परिसरातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रेत्यांना एका मर्जीतल्या व्यक्तीकडून दुचाकीद्वारे दिवसाढवळ्या व रात्रीला भर चौकातूनच दारूचा पुरवठा केला जातो हे विशेष.
       चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेवाळे यांचेशी सदर वृत्ता संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


Post a Comment

0 Comments