Ticker

6/recent/ticker-posts

*💥 बेरडी च्या जंगलात आढळला अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह*




*🏀 परिसरात खळबळ*
जनवार्ता भारत डॉट कॉम
पोंभुर्णा प्रतिनिधी
      पोंभूर्णा तालुक्यातील चींतल धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बेरडी या गावात नजीक जंगलातील तलावाजवळ अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतक इसम कोण असावा याचे चिंतन परिसरात होत आहे.
       चींतल थांबा बेटातील कक्ष क्रमांक 119 मधील बेरडी जंगलातील तलावाजवळ बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्याला सदर मृतदेह दिसून आल्याने त्याची भंबेरी उडाली. गुराख्याने संबंधित घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना दिली. माहिती मिळताच पोलीस पाटलांनी कोठारी पोलीस ठाणे व मुन्ना वन परिक्षेत्र अधिकारी यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोंभुर्णा वनाधिकारी व कोठारी पोलिस ठाण्याची घटनास्थळावर दाखल झाली. घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मृतदेह दिसून उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आला असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनेचा पुढील तपास कोठारी पोलीस वन विभाग पोंभूर्णा यांच्या संयुक्त माध्यमातून सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

Post a Comment

0 Comments