Ticker

6/recent/ticker-posts

*💥हे मुख्याध्यापक की हुकूमशहा? नांदगाव हायस्कूलच्या प्राथमिक शिक्षकांची गळचेपी*


मुल

जुनगाव प्रतिनिधी
       मूल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांचे जन्मगाव असलेल्या नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शिक्षणाचा पाया हा भक्कम असला पाहिजे असे मत शिक्षण तज्ञ व्यक्त करतात. आणि तो पाया प्राथमिक शिक्षणच आहे.मात्र हा पाया ग्रामीण भागात भक्कम नसल्याने उभ्या होणाऱ्या इमारती सुद्धा ढासळणार्‍याच निर्माण होत आहेत. मात्र इमारती उभ्या करणारे मिस्त्री वर्ग जसे मालामाल झाले आहेत, तसेच शिक्षकही काहीही इमारती तयार न करता ऐशोआरामाची जिंदगी जगत आहेत. विद्यार्थी शिकले काय? घडले काय ? हे आताच्या शिक्षकांना याचे काहीही देणे-घेणे नाही असेच आजच्या शिक्षण प्रणाली वरून सिद्ध होते. किंबहुना महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा वसा अंगीकारलेल्य शिक्षकांचा सर्वांना स्वाभिमान आणि अभिमान आहेच! सर्वत्र असेच शिक्षक निर्माण झाले तर शिक्षणामध्ये देश मागे पडणार नाही.
      नांदगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला स्वतंत्र इमारत नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये व प्राथमिक शिक्षणाचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून नांदगाव येथीलच सुसज्ज हायस्कूलच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू आहे. परंतु हायस्कूलचे मुख्याध्यापक बोरीकर हे प्राथमिक शिक्षकांना भौतिक सुविधांचा वापर करण्यास प्रतिबंध व हायस्कूलच्या वेळापत्रकाचे पालन करण्याबाबत बंधने लादणे, तसेच शौचालयाचा वापर न करण्याबाबत हुकूमशाही पद्धतीने आदेश देत असल्याने शिक्षक व विद्यार्थी  दडपणाखाली येऊन मानसिक तणावाखाली आहेत. अशा या वारंवारच्या त्रासामुळे व घटनांमुळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक धनराज पाटील यांनी शिक्षक संघटनेकडे आपल्यावरील घडलेली हकीकत सांगितल्याने बेंबाळ बिटातील सर्व शिक्षकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून गटविकास अधिकारी सुनील कावडवार यांना  २ मे २०२२ रोजी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.
       गटविकास अधिकाऱ्यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचायत समिती कक्षात ४ मे रोजी सर्व शिक्षकांची समन्वय समितीसमोर सुनावणी घेतली. दरम्यान हायस्कूलचे मुख्याध्यापक बोरीकर यांनी सदर प्रकाराबाबत सर्वासमक्ष माफी मागितली व सर्व प्राथमिक शिक्षकांना आदराची वागणूक देण्याची हमी दिली. त्यामुळे चिघळलेला वाद येथेच मिटला आहे.

Post a Comment

0 Comments