Ticker

6/recent/ticker-posts

*अनियंत्रित कारचा भीषण अपघात, एक जागीच ठार तर अन्य चार जण जखमी*



पोंभुर्णा : तालुका प्रतिनिधी
पोंभूर्णा तालुक्यातील आंबे धानोरा येथील युवक चार चाकी वाहनाने चेक पारगाव येथे विवाह सोहळ्यास जात असताना विठ्ठलवाडा -भंगाराम तळोधी मार्गावर चेक विठ्ठलवाडा गावाजवळ अनियंत्रित कार पलटी झाल्याने या अपघातात वाहन चालक जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. चिन्मय महिपाल जुमनाके वय 18 राहणार आंबे धानोरा असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर समीर कोडापे,आशिष कोडापे, आकाश मेश्राम, राहणार आंबे धानोरा हे जखमी झाले आहेत. 
        घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार जीवन राजगुरु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments