Ticker

6/recent/ticker-posts

भंडाऱ्यात भीषण अपघात: एक ठार,एक गंभीर जखमी



भंडारा

भंडारा : भंडारा येथून वरठी येथील सनफ्लॅग कंपनीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात सनफ्लॅग कंपनीचे टेक्निशियन रमेश टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, डेप्युटी मॅनेजर युवराज भूरे हे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास वरठी ते सिरसी या महामार्गावर घडली.

रमेश टंडन आणि युवराज भूरे हे दोघेही मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत नोकरीवर आहेत. काही महत्त्वाच्या कामाकरिता हे दोघेही रमेश टंडन यांच्या चारचाकी वाहनाने भंडारा येथे आले होते. काम आटोपून रात्री दोघेही वरठी येथील निवासस्थानाकडे परत निघाले होते. दरम्यान, सिरसीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यात टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, गंभीर भुरे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघातानंतर अपघातास जबाबदार वाहन घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी भुरे यांना प्रथम भंडारा येथे आणि त्यानंतर नागपूरला हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी वरठी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष वंजारी करीत आहे.

Post a Comment

0 Comments