Ticker

6/recent/ticker-posts

*▪नगरपंचायत वाऱ्यावर..मुख्याधिकाऱ्यांचे दर्शन दुर्लभ.* *▪अनियंत्रित ,सैरावैरा प्रशासन;जनतेचे हाल बेहाल.*

*▪नगरपंचायत वाऱ्यावर..मुख्याधिकाऱ्यांचे दर्शन दुर्लभ.*

*▪अनियंत्रित ,सैरावैरा प्रशासन;जनतेचे हाल बेहाल.*

*पोंभूर्णा/१५ एप्रिल.*

नगरपंचायतच्या निर्मिती पासुनच प्रभारी मुख्याधिकारी व कर्मचाऱ्याचा शाप असलेली आणि सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेली ही यंत्रणा निव्वळ बल्लारपुर व मुलच्या नगरपरिषदेमार्फत चालवण्यात येत असली तरी मागील पंधरा दिवसांपासून मुख्याधिकारी यांचे पोंभूर्णा नगरीला दर्शन झाले नाही. त्याचबरोबर यांच्या सोबत येणारे अभियंते, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुध्दा नगरपंचायतकडे पाठ फिरवली असुन  यामुळे जनतेचे हाल होत असतांना सत्तारूढ पदाधिकारी यांच्या सैल कारभाराने स्थानिक प्रशासनही सैरावैरा व अनियंत्रित असुन नगरपंचायत मधील कार्यालयीन खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. 

पहिली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर   विविध प्रश्नावर निरुत्तर झालेले सत्ताधिकारी व मुख्याधिकारी यांनी अधिक जोमाने जनतेच्या प्रश्नावर पोटतिडकीने निर्णय घेणे अपेक्षित असताना मागील पंधरा दिवसांपासून मुख्याधिकारी समवेत शापीत ठरत असलेल्या 'व्हाईट हाॅऊस ' कडे पाठ फिरवली असुन ,मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्रशासनाला वाऱ्यावर सोडून दिल्यागत चित्र निर्माण झाले आहे. जनतेचे अनेक प्रश्न, समस्या मागील दिड दोन वर्षापासून अनुत्तरीत राहील्या, त्या सोडवण्याची व विरोधकांना निरुत्तर करण्याची संधी असतांना ढिम्म सत्तारूढ पदाधिकारी व उंटावरून शेळ्या हाकणारे मुख्याधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी सरळ काढता पाय घेतला की काय, असे निदर्शनास येत आहे. यामुळे विकासात्मक कामे तर सोडाच, साधे जनतेच्या समस्याचे अर्ज निकाली निघत नाही आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचे तिन-तेरा झाले असुन कोण ठेकेदार व कोण मजूर समजण्यास मार्ग उरला नाही. घरकुलाचा प्रश्न मागील तिन चार वर्षांपासून रेंगाळत असुन अजूनही जनतेच्या भिंतीवर कायमस्वरूपी छप्पर पडलेले दिसत नाही. नमुना ८-अ असो, वा अत्त्यावश्यक कागदपत्रावर मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी असो, नागरीकांना ताटकळत बसने क्रमप्राप्त झाले आहे. नगरपंचायतच्या आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेले आठवडी बाजार व रोज गुजरी लिलावावर कर्मचारीच फना काढून बसले असुन मागील कोरोना काळापासून आत्तापर्यंतच्या दैनंदिन गुजरी व आठवडी बाजारापासूनचे उत्पन्न स्वाहा होत आहे. 

विदारक परिस्थितीने कळस गाठला असल्यांने त्याची सोडवणूक करणे अपेक्षित असताना त्याकडे पाठ फिरवतानाचे विदारक चित्र निदर्शनास येत आहे. निव्वळ आमदाराच्या माध्यमातून निर्वाचित झालेले व या मातीच्या सेवेसाठी मते मागुन, विकासाचा चेहरा समोर ठेवून निवडून येणारे सत्तारूढ नगरसेवक व पदाधिकारी तरी ज्यांच्या माध्यमातून निवडून आले, त्यांच्या ॠणांची परतफेड करण्यापेक्षा स्वहिताकरीताच झटतांनाच अधिक दिसत असुन नगरपंचायतला वाऱ्यावर सोडून अनियंत्रित व सैरावैरा प्रशासनाने विकासाची गती धरणे अपेक्षित आहे. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
                   वस्तुस्थितीमध्ये नगरपंचायत विकासात्मक कामे तर सोडाच जनतेच्या दैनंदिन समस्या निकाली काढण्यात अपयशी ठरत असुन ,मुख्याधिकारी असो वा नगराध्यक्ष यांनी जनतेच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून प्रशासनामध्ये  नियमीतता आणणे अपेक्षित आहे. सध्यास्थितीत जनतेला शुल्लक कामासाठी येरझाऱ्या माराव्या लागत असुन विकासाचे आभाशी चित्र निर्माण करून सत्तेत येणारे पदाधिकारी व सामान्य जनतेच्या पैशातून लाखो रूपयाचे वेतन घेणारे अधिकारी यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करावे,एवढीच  रास्त अपेक्षा आहे. 
                     आशिष कावटवार, 
           विरोधी पक्ष गटनेता, नगरपंचायत पोंभूर्णा. 

=================================

Post a Comment

0 Comments