Ticker

6/recent/ticker-posts

*▪पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी घाटावरून बिनबोभाट रेती उत्खनन..* *▪लिलावात नसतांनाही भिमणी घाटावर होत आहे अवैद्य रेती तस्करी*

*▪पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी घाटावरून बिनबोभाट रेती उत्खनन..*

*▪लिलावात नसतांनाही  भिमणी घाटावर होत आहे अवैद्य रेती तस्करी*

*▪भिमणी येथे गोंडपिपरी-मुल मार्गावर रस्त्यांलगतच केला जात आहे अवैध रेतीचा साठा*


*पोंभूर्णा/१४ एप्रिल.*

 
भिमणी घाटकुळ दरम्यान खेडी-गोंडपिपरी मार्गावरील रोड लगतच्या शेतात प्रचंड मोठे वाळूचे डोंगर उभारले असुन हजारो ब्रास रेतीचे उत्खनन, वाहतूक व साठा होतांना प्रशासनाची अनभिज्ञता किंवा मौनधारणा बरेच काही सांगून जाणारी आहे. एवढ्या मोठ्या धाडसामागे नक्कीच मोठे हात असल्याशिवाय हे शक्य नसल्याची जनतेत कुजबुज सुरु  आहे.या ठिकाणी उपस्थित जेशिबी, हाॅयवा, विद्युत पुरवठा, टिन शेडचे ऑफिस या सोबत अठरा हजार ब्रास उत्खननाचा सुचक फलक अधिकृतपनाचा आभास निर्माण करीत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाटेल तिथून उत्खनन करून,तालुक्यातील वाळू साठा पोखरून ,नंतर मनमर्जीने याचा व्यवहार करून करोडो रुपये कमवण्याचा घाट घातला असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. महसूल प्रशासनाच्या डोळ्यावर कोणी पट्टी बांधली आहे, की प्रशासनच कुंभकर्णी झोपेत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुर्योदयापुर्वी ते सुर्यास्तानंतर रेतीचे उत्खनन करू नये, यांत्रिक साधनांचा वापर करू नये, असे असतांना जेशिबी,पोकलॅन्ड लावून अहोरात्र रेतीची लुट सुरू असुन दिवसरात्र याची वाहतुकही सुरू आहे. मंजूर ब्रास पेक्षा कित्येकपट अधिकची रेती उत्खनन होतांना या टोळी मागे कोणाचा आशिर्वाद आहे, जेणेकरून प्रशासनाने मुकसंम्मती दर्शवून यांच्याकडे पुरते दुर्लक्षच केले असुन सदर रेतीसाठा,नदीतील उत्खनन याची मोजणी करण्यात यावी व होत असलेली लुट थांबवून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा अशी मागणी जनतेकडून होत आहे. 

रेतीचे अवैध उत्खनन होत असताना,तथापि वाहतूक होत असताना उपविभागीय अधिकारी,तहसीलदारासह संबंधित महसूल अधिकाऱ्यांना माहिती असतांनाही कोणतीही कारवाई केली जात नाही,यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. पोंभूर्णा तालुक्यातील भीमणी लगत गोंडपिपरी तालुक्याच्या हदित असलेला चेक लिखीतवाडा अंधारी नदीवरील रेतीघाट लिलावात असुन त्याचा फायदा घेत लिलाव न झालेला भीमणी घाटातून सरासपणे उत्खनन करुण त्याच घाटाच्या रस्त्याने अवघ्या १ किमी अंतरवार असलेल्या भीमनी येथील  नीलकंठ  गिरसावळे यांच्या शेतात साठा करण्यात येत असुन तो साठा उंच डोंगर, सदृष्य आहे.हे सर्व विशिष्ट राजकीय पक्षातील नेत्यांने करित असल्याने  पोंभुर्णा व गोंडपिपरीची  प्रशासकीय यंत्रणा  त्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

चेक लिखितवाडा रेती घाट हा गोंडपिपरी तालुक्यात येत आसल्याने त्या घाटावरुन रेती उत्खनन करुण भीमनी येथे साठा करणे म्हणजे  जवळपास १५ किमीचे अंतर  पडते. भिमणी हे गाव पोंभूर्णा तहसिल मध्ये येत असतांनाही जमा केलेला रेतीचा डोंगराएवढा स्टॉक कायम ठेवून अजूनही भीमनी नदीतूनच अवैधरित्या रेतीची चोरी सुरू आहे. हा साठा अवैद्य असून मंजूरीपेक्षा अधिक उत्खनन केलेला असल्यांने, तो जप्त करून, कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
  
रेती उत्खननासाठी दिलेल्या रेती घाटाची मोजणी करण्यात यावी, मंजूरीपेक्षा इतर ठिकाणावरून रेती उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारांवर रेती चोरीचे गुन्हे दाखल करावे, आजपर्यंत वाहतूक केलेली रेती व करून ठेवलेला रेती साठा याची चौकशी करून, रेती तस्करावर कारवाई करावी, शासन नियमाचे उल्लंघन करून, सुर्योदयापुर्वी आणि सुर्यास्तानंतर, यांत्रिक साधनांचा वापर करून, रेती उत्खनन करणाऱ्यावर व  याबाबत पुराव्यासह तक्रारी देवूनही, रेती तस्करांना साथ देणारे प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
================================

Post a Comment

0 Comments