Ticker

6/recent/ticker-posts

*बहुचर्चित पोंभूर्णा नगर पंचायत मधील कंपोस्ट खत चोरी प्रकरणाची नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी घेतली दख्खल*

*बहुचर्चित पोंभूर्णा नगर पंचायत मधील कंपोस्ट खत चोरी प्रकरणाची नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी घेतली  दख्खल*

*गटनेता आशिष कावटवार यांनी प्रत्यक्ष भेटून दिली खत चोरी प्रकरणाची माहिती*

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी सजय मीणा करणार चोरी प्रकरणाची चौकशी 


पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
      
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्णा येथील बहुचर्चित नगरपंचायत मधील खत घोटाळा प्रकरणी मुख्याधिकारी यांनी खोटी माहिती दर्शवून दिशाभूल केली असा आरोप तक्रारीत करत त्यांच्या सर्व कारभाराची सखोल चौकशी करावी व दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नगरपंचायत चे  विरोधी पक्ष गटनेता आशिष कावटवार व नगरसेवकांनी केली आहे.
      राज्याचे नगर विकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सुरजागड प्रकल्प पाहणी दौऱ्यादरम्यान सदर निवेदन देऊन मागणी करण्यात आली. मंत्रीमहोदयांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तात्काळ गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची सूचना दिली. त्यामुळे या प्रकरणाला आता मोठा वेग आलेला आहे. भ्रष्टाचारात कोण कोण समाविष्ट आहेत हे बघण्याकरिता तालुक्यातील व पोंभुर्णा शहरातील नागरिक उत्सुक झालेले आहेत.

Post a Comment

0 Comments