Ticker

6/recent/ticker-posts

*दिल्लीचे मा. मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावर झालेल्या हमल्याच्या विरोद्धात चामोर्शी हत्तीगेट चौकात मुकनिषेध आंदोलन*


चामोर्शी


चामोर्शी:- सुखसागर झाडे

     दिल्लीचे मा. मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावर झालेल्या हमल्याच्या विरोधात आप चामोर्शी वतीने हत्तीगेट चौकात आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुखसागर झाडे यांच्या नेतत्वाखाली चामोर्शी येथील हत्तीगेट समोर निषेध कार्यक्रम घेण्यात आला. 

 कालचा दिल्लीचे मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावर बीजेपी सांसद तेजस्वी सूर्याने आपल्या 50 ते 60 समर्थक घेवून हमला केला. हा हमला केवळ  अरविंद केजरीवाल यांच्यावर नसून दिल्ली व पंजाब मधील लोकाभिमुख निर्णय प्रक्रियेवरील हल्ला आहे. आप पार्टीची संपूर्ण देशात वाढती लोकप्रियता पाहून बीजेपी आम आदमी पार्टी आणि त्यांचे मुख्य नेत्यांना संपविण्याचा कट रचनेचा हा काल झालेला हमला आहे. मुख्यमंत्री बंगल्यावर पोलिसांचा कडक बदोबस्त असूनही बिजेपीचे गुंडे तोडफोड करण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी या गुंड्यावर कोणतीही कार्यवाही न करण्याचा निर्णय घेतला होता. पोलीस आपले आका देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली कार्य करीत आहेत, असे या हमल्यावरुन दिसून येते.

आम आदमी पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान द्वारे काल जनतेला घरोघरी राशन पोहचिवण्याचे कार्यक्रम शुरू झाल्याने बीजेपीला मोठा धक्का बसला. दिल्ली मध्ये ही योजना मागील तीन वर्षांपासून भाजपा सरकारने अडकवून ठेवली आहे. जनतेला मिळत असलेली उच्च दर्जाच्या आरोग्य व शिक्षण सुविधा आणि मोफत वीज, पाणी मुळे भाजपाला येणाऱ्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागेल, म्हणूनच हा हमला करण्यात आला. या हमल्यात भाजपाचे राष्ट्रीय पातळीवर असलेले नेते शामिल असून त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कार्यवाही न होत असल्याने जनतेमध्ये भाजपच्या विरोधात रोष निर्माण झालेला आहे.

आजच्या मुक निषेध कार्यक्रमात तालुका युवा संयोजक धनराज कुसराम, प्रशांत कुसराम, उराडे जी, भावना चांदेकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments