Ticker

6/recent/ticker-posts

तळोधी (बाळापुर ) येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन



पोंभुर्णा: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपुर( ग्रामिण) प्राथमिक ,माध्यमिक ,ऊच्च माध्यमिक ,नगरपरिषद ,अपंग समयोजित जि.प.प्राथमिक ,आदिवासी आश्रमशाळा इत्यादी विभागाचे संयुक्त चंद्रपुर ग्रामिण जिल्हा अधिवेशन दिनांक 6 मार्चला यादवराव पोशट्टीवार महाविद्यालय तळोधी बाळापुर ता.नागभिड येथे आयोजीत करण्यात आले आहे.
 सकाळी 9 वाजता चर्चासत्र / अभ्यासवर्ग 
अध्यक्ष - रामदास गिरटकर जिल्हा कार्यवाह ,वक्ता - योगेश बन कार्यवाह नागपुर विभाग ,विशेष ऊपस्थिती - दिलीप मॕकलवार जिल्हा सहकार्यवाह ,किशोर टेंभुर्ण जिल्हा संघनमंत्री.
सकाळी 10.30 वाजता अधिवेशनाच ऊद्दघाटन 
ऊद्दघाटक - बंटीभाऊ भांगडिया आमदार चिमुर विधान सभा क्षेत्र ,
अध्यक्ष - के.के.बाजपेयी अध्यक्ष नागपुर विभाग ,
प्रमुख मार्गदर्शक - नागो पुडंलिक गाणार शिक्षक आमदार नागपुर विभाग ,
पुजाताई चौधरी - राज्य महिला आघाडी प्रमुख ,योगेश बन कार्यवाह नागपुर विभाग ,प्रकाश चुनारकर राज्य कार्याध्यक्ष ,सुनिल पाटील अध्यक्ष नागपुर विभाग ,विनोद पांढरे ऊपाध्यक्ष नागपुर विभाग ,विलास बोबडे कार्यवाह नागपुर विभाग ,नरेश कामडे कोषाध्यक्ष नागपुर विभाग ,रंजना कावळे - अध्यक्ष नागपुर विभाग (प्राथमिक ) ,हेमंत बेलखोडे कार्यवाह नागपुर विभाग (प्राथमिक )
प्रमुख ऊपस्थिती - मधुकर मुप्पीडवार जिल्हाध्यक्ष ,रामदास गिरटकर जिल्हाकार्यवाह  ,विलास खोंड जिल्हा कोषाध्यक्ष ,मोरेश्वर गौरकर जिल्हाध्यक्ष (प्राथमिक ) ,अमोल देठे जिल्हाकार्यवाह (प्राथमिक )आदि मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनातील विषय - सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागु करणे ,घोषीत व अघोषीत प्राथमिक , माध्यमिक ,ऊच्च माध्यमिक शाळा व तुकड्या तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना प्रचलित नियमानुसार आनुदान देणे,शिक्षक पात्रता परिक्षा ऊत्तीर्ण नसलेल्या शिक्षंकाना सेवा संरक्षण देणे तसेच अनेक विषय चर्चीला जाणार आहे.
तरी या अधिवेशनाला शिक्षंकानी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक - मनोहर झोडे , सहसंयोजक - अमोल रेवस्कर ,दिलीप मॕकलवार ,अतुल केकरे ,विलास खोंड ,विलास  वरभे ,गजानन शेळके ,राजेंद्र मोहीतकर ,हरिभाऊ गरफडे ,तुळशीदास राऊत ,किशोर टेंभुर्ण ,शांताराम काळे ,वंसत वडस्कर , विवेक आंबेकर ,संध्या गिरटकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments