Ticker

6/recent/ticker-posts

*जुनगाव वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या निर्मितीस मंजुरी: येत्या मार्च महिन्यात बांधकामास होणार सुरुवात, अभियंता मुकेश तांगडे यांची माहिती*



पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
       पोंभुर्णा आणि चामोशी तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या जुनगाव येथील वैनगंगा नदीच्या उप प्रवाहावर मोठ्या पुलाच्या निर्मितीस मंजुरी मिळाली असून येत्या मार्च महिन्यात प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल, असे पोंभुर्णा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश तांगडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.
       वैनगंगा नदीच्या विळख्यात वसलेल्या जुनगाव येथे पावसाळ्यात दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, अनेक दिवस या गावचा इतर गावांशी संपर्क तुटतो. ही बाब गांभीर्याने घेऊन या विभागाचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून मोठ्या पुलास मंजुरी मिळवून दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी याच वैनगंगा उपप्रवाहावर पुलाच्या निर्मितीचे प्रयत्न झाले. आणि ते पूर्णत्वास येऊन पुलाची निर्मितीही झाली. परंतु सदर पूल हा बुडीत पूल असल्यामुळे कुचकामी ठरला आहे. आता मोठा पुल होणार आणि पावसाळ्यातील दरवर्षीचा धोका टळणार या आशेने गाव वासीय आनंदात दिसत आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे गावसीयांनी आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments