Ticker

6/recent/ticker-posts

*जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गावातील व्यक्तीचं नाव* *शिवाजी श्रीरामे व मुख्याध्यापकावर कारवाई करा* शेख हक्कानी यांनी संवर्ग विकास अधिकारीला दिले निवेदन ------------------------- ( सय्यद शब्बीर जागीरदार )



-------------------------
( सय्यद शब्बीर जागीरदार )

जिवती:- तालुक्यातील बिट केंद्र पाटण अंतर्गत येत असलेल्या माथाडी या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा अफलातून कारभार समोर आला असून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गावातील व्यक्तीचा नाव " शिवाजी बालाजी श्रीरामे स्कुल माथाडी " अश्या प्रकारे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर नाव देण्यात आले असल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. गावातील लोकांनी संवर्ग विकास अधिकारी व मरकागोंदी ग्रामपंचायत सचिवा कडे सदर व्यक्तीवर कारवाई करावी अशी तक्रार केली असून सदर व्यक्तीवर कारवाई झाली नसल्याने व शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरुन नाव हटवण्यात आला नसल्याने गावातील तक्रार कर्ते शेख हक्कानी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना संपर्क साधून माहिती दिली. शेख हक्कानी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरुन सदर व्यक्तीचा नाव हटवण्यात यावे. 


शिवाजी बालाजी श्रीरामे राहणार माथाडी व शाळेचे मुख्याध्यापकावर विभागीय चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.


Post a Comment

0 Comments