Ticker

6/recent/ticker-posts

*धक्कादायक: आठवीतील विद्यार्थिनीचा विहिरीत आढळला मृतदेह ; चामोर्शी तालुक्यातील येनापुर येथील घटना*



चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या  येनापुर  गावातील ही धक्कादायक घटना घडली आहे. तीन दिवसापासून मुलगी प्रेमसंबंध असलेल्या मुलासोबत पळाली,अशा ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले होते, पण आज तिचा  मृतदेह विहरित सापडल्याने खळबळ उडाली आहे.
 सुजाता (तनु)  जनार्धन गोंगले असे मयत मुलीचे नाव असून बेघर कॉलनी मधिल रहवासी आहे, माहिती वरुन ती इयत्ता आठवी ला गावातच शिक्षण घेत होती, तीन दिवसाआधी सुजाता कुणालाही काही न सांगता बेपत्ता झाली होती ,त्यामुळे गावात ती एखाद्या मुलासोबत पळाली असावी अशी चर्चा होती, मात्र सर्वांनी दाद खोटे ठरवत आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान लक्ष्मण राऊत यांच्या विहरीत सुजाता गोंगले ईचा मृतदेह पाहून गावात खळबळ उडाली. 
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सदर विद्यार्थिनीचा मृत्यू कसा झाला याचा तपास पोलीस करणारच!

Post a Comment

0 Comments