Ticker

6/recent/ticker-posts

दुचाकीच्या चाकात साडीचा पदर गेल्याने महिलेचा मृत्यू : भेजगाव पुलाजवळील घटना

दुचाकीच्या चाकात साडीचा पदर गेल्याने महिलेचा मृत्यू : भेजगाव पुलाजवळील घटना
जूनगाव: प्रतिनिधी
       नातेवाईकाचे लग्न आटोपून दुचाकीने परत येत असताना दुचाकीवरील महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडकल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. ही घटना भेजगाव पुलानजीक घडली.  ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास घडली.
      कल्पना विलास नंदगिरीवार वय वर्षे 55 राहणार देवळा बुद्रुक असे मृत महिलेचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कल्पना नंदगिरीवार देवळा बुद्रुक येथील ही महिला चुलत बहिणीच्या लग्नासाठी मुल येथे गेली होती. लग्न आटोपून घोडे नामक व्यक्तीच्या दुचाकीवर बसून परत येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. बिजगाव पुलाजवळ दुःखी दुचाकीच्या चाकात कल्पनाचा पदर गेल्यामुळे हा भयंकर अपघात घडून तिच्याच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments