Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आजार ग्रस्त विद्यार्थिनीला धनादेश वितरण कार्यक्रम.- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम - जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांची संकल्पना

शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आजार ग्रस्त विद्यार्थिनीला धनादेश वितरण कार्यक्रम

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांची संकल्पना



जुनगाव प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय संतोष सिंह रावत यांच्या संकल्पनेतून शेतकरी कल्याण निधी योजना जिल्ह्यात सुरू असून दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेतकरी शेतमजुरांच्या कुटुंबीयांना त्यांच्या उपचाराकरिता निधीची व्यवस्था करण्यात येते.


      पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी मुखरू पाल वर्ग सातवा या विद्यार्थिनीच्या आजाराकरिता वीस हजार रुपयाचा तात्काळ धनादेश मंजूर करण्यात आला.


      नांदगाव च्या सरपंच हिमानीताई दशरथ वाकुडकर यांच्या हस्ते सदर धनादेश विद्यार्थिनीच्या पालकांना देण्यात आला.


     या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुनम ताई चुधरी या लाभल्या होत्या,तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती मूल दशरथ वाकुडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल भोयर, माजी सरपंच तथा शिवसेना तालुका उपप्रमुख जीवनदासजी गेडाम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पांडुरंग पोरटे, माजी उपसरपंच साईनाथ गोहणे, मुखरू जी पाल, मुख्याध्यापक पिंपळशेंडे, बट्टे  सर, चुधरी सर, कोसरे सर, कृष्णा मडावी सर, दलपत शहा मडावी सर, गेडाम सर, कुमारी गेडाम मॅडम उपस्थित होते.


     याप्रसंगी सरपंच हिमानी वाकुडकर तथा दशरथजी वाकुडकर यांनी शेतकरी कल्याण निधी विषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शाळेचे माजी मुख्याध्यापक बट्टे सर यांनी तर संचालन कोसरे सर यांनी केले. कार्यक्रमाला गावातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.








Post a Comment

0 Comments