Ticker

6/recent/ticker-posts

झोपेत घोरणाऱ्यांसाठी हे आहेत घरगुती उपाय- नक्की करून बघा


 घोरण्यामुळे अनेक व्यक्तींना अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे घोरणे थांबवण्याचे काही घरगुती उपाय आहेत, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही झोपल्यानंतर घोरता, मग हे घरगुती उपाय कराच!

फोटोःगुगल.


घोरण्यामुळे अनेक व्यक्तींना अपमान सहन करावा लागतो. रात्री झोपल्यावर घोरणाऱ्या व्यक्तीमुळे अनेकांची झोप होत नाही. आपण झोपले असल्याने आपल्याला नाही कळत आपण घोरतोय ते पण सकाळी उठल्यावर जेव्हा लोकं सांगतात तुम्ही घोरत होतात आणि त्यामुळे आमची झोप झाली नाही. तर आपल्या अपमान झाल्यासारखं वाटतं. घोरण्यावर काही घरगुती उपाय आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय


1. हळद – हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषधं आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर आहे.


2. ऑलिव ऑयल – हो ऑलिव ऑयलमुळे तुमची घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव ऑयलने तुम्ही नाक साफ केल्यास तुम्हाला श्वास घेण्यास सोपं होईल. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव ऑयलचे दोन तीन थेंब नाकात घाला आणि मग झोपा. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास मदत होईल.


3. देशी तूप – तज्ञ्जांनुसार नाक साफ नसल्यास तुम्हाला घोरण्याची समस्या असू शकते. त्यामुळे नाक साफ असणे फार गरजेचं आहे. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी देशी तूप जरा कोमट गरम करा आणि ते नाकात टाका. यामुळे घोरण्याची समस्या कमी होईल.


4. लसून – घोरण्याच्या समस्येवर लसून हे रामबाण उपाय आहे. लसूनचं सेवन केल्यामुळे तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून मुक्ता मिळू शकता. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन तीन लसून खा.


5. पुदीना – पुदीनाचाही खूप फायदा आहे. पुदीनाला पाण्यामध्ये उकळा त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या करा. अगदी हे पाणी प्यायला तरी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे रोज रात्री हा उपाय केल्यास काही दिवसांनी तुमची घोरण्याची समस्या कमी होईल.


6. हळद आणि मध – रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमच हळद आणि एक चमचा मध याचं सेवन करा. रोज काही दिवस हे केल्याने तुमची घोरण्याची समस्या कमी होईल.


7. वेलची पावडर – हो रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची पावडर टाकून ते पाणी प्या. याचाही खूप फायदा होतो. आरोग्यासंदर्भात कुठलीही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. आरोग्याची कुठलीही समस्या ही एखाद्या आजाराचं लक्षण असू शकते. त्यामुळे आपल्या फॅमिली डॉक्टरला त्यासंदर्भात नक्की सांगा.


टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा....


साभार...

Post a Comment

0 Comments