Ticker

6/recent/ticker-posts

*थंडीची लाट! शीतलहरीने गारठला पोंभुर्णा तालुका*

*थंडीची लाट! शीतलहरीने गारठला पोंभुर्णा तालुका* 

पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी

तालुक्यात मागील दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा या दोन दिवसांमध्ये कमालीचा वेगाने घसरत आहे.यामुळे तालुका वासियांना रात्री व दिवसभर थंडीची तीव्रता वाढलेली आहे. हवेत बाष्पचे प्रमाण अधिक राहिल्याने हुरहुर वाढली आहे. दुपारी बारा वाजेनंतर ऊन कडक पडल्यामुळे गारठलेल्या नागरिकांची हुडहुडी कमी होण्यास मदत झाली. मात्र आज शुक्रवारी थंडीने कहरच केला दिवसभर व संध्याकाळपर्यंत थंडीची तीव्रता जाणवली.
 थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे दोन दिवसांपासून सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांकडून दिवसभर ऊबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जात आहे.  तसेच चहालाही मागणी वाढली असून चहाविक्रीच्या दुकानांवर गर्दी दिसू लागली आहे.

१७ जाने. २०२०ची पुनरावृत्ती

मागील वर्षी १७ जानेवारी रोजी थंडीचा असाच कडाका चंद्रपूर जिल्हा वासियांनी अनुभवला होता. त्या दिवशीही शहराचे किमान तापमान खाली घसरल्याची नोंद झाली होती. पूर्वी लोक त्यांचा आधार घेऊन थंडीचा सामना करायचे मात्र आता जळाऊ लाकडांची कमतरता, व ग्यास सिलेंडर चा वापर वाढल्याने जळाऊ काड्या मिळेनाशा झाल्या असल्याने थंडीचा सामना करणे आता कठीण झाले आहे.

Post a Comment

0 Comments