Ticker

6/recent/ticker-posts

धानोरा नगर पंचायत मध्ये काँग्रेस पक्षाने राखली धानोरात काँग्रेसची एकहाती सत्ता, तर चामोर्शीत त्रिशंकु अवस्था


 गडचिरोलीब्रेकिंग न्यूज:-


*धानोरा नगर पंचायत मध्ये काँग्रेस पक्षाने राखली धानोरात काँग्रेसची एकहाती  सत्ता, तर चामोर्शीत त्रिशंकु अवस्था



गडचिरोली.(धानोरा/चामोर्शी) सुखसागर झाडे

    गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूकीचा निकाल आज घोषित झाला.

गडचिरोली विधान सभेचे भाजप चे आमदार डॉ देवराव होळी यांच्या निर्वाचन क्षेत्रात येणाऱ्या धानोरा नगर पंचायत मध्ये काँग्रेस पक्षाने एक हाती सत्ता राखलेली आहे.या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 13, भाजपचे 3,आणि अपक्ष 1 उमेदवार निवडून आलेले असून शिवसेनेला या ठिकाणी एकही उमेदवार निवडून आलेला नाही . तर  चामोर्शी नगरपंचायत मध्ये कांग्रेस पक्षाचे- 8, राष्ट्रवादी-5,भाजपा-3 अपक्ष-1 अशी विजयी उमेदवाराचा निकाल घोषित झाल्याने चामोर्शी नगरपंचायत मध्ये मोठी रस्सीखेच होण्याचे भविष्यमयीन चित्र काय असणार, पक्षा-पक्षात काय होणार कोणता पक्ष सत्ता काबीज करणार याची चुरस निर्माण झाली आहे. 

     

    भाजप आमदाराच्या विधानसभा क्षेत्रात धानोरा,आणि चामोर्शी या दोन्ही नगर पंचायत काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने भाजपला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागलेला आहे. 

   कांग्रेस पक्षाने धानोरा नगर पंचायत मध्ये एक हाती सत्ता काबीज करीत चामोर्शी नगरीत ८ उमेदवाराने बाजी मारली आहे.काँग्रेस पक्षाने दणदणीत विजयाचा तूरा रोवल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

Post a Comment

0 Comments