Ticker

6/recent/ticker-posts

सर्व व्यवहार सुरू होणारा गडचिरोली ठरला महाराष्ट्रामधील पहिला जिल्हा

सर्व व्यवहार सुरू होणारा गडचिरोली ठरला महाराष्ट्रामधील पहिला जिल्हा

खळबळजनक न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती काही प्रमाणात निवळत आहे. तर दुसरीकडे मुंबई, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील स्थिती चिंताजनक आहे. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर परिणाम झाला आहे. पण, दररोज वाढत चाललेल्या रुग्णांमुळे आरोग्य विभागालासमोर आव्हान उभं राहत आहे. त्यामुळे लॉकडाउन लांबत जाणार असं चित्र सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात आहे.


तर दुसरीकडे सर्व व्यवहार सुरू होणारा ग्रीन-झोनमधील गडचिरोली हा पहिला जिल्हा ठरला आहे. तर सोमवारपासून चंद्रपूर जिल्हयात लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करून दुकाने सकाळी 10 ते 2 सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

तसेच व्यवसाय व दुकानाना सकाळी 7 ते सायंकाळी 5 सुरू ठेवण्याची परवानगी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंघला यांनी दिली आहे. याचप्रमाणे बस सेवा 50 टक्के सुरू राहणार आहे. मात्र शाळा, महाविद्यालयात, कोचिंग, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत.


दरम्यान, ‘दुचाकीवर केवळ एका नागरिकाला मुभा, रिक्षामध्ये मागच्या सीटवर फक्त दोन व्यक्ती,चार चाकी गाडी ड्रायव्हर आणि मागे दोन व्यक्ती, जिल्हा अंतर्गत आता पासची गरज नाही, जिल्हा बाहेर प्रवास करता येणार नाही, बाहेरून येणारा व्यक्ती 14 दिवस क्वारंटाइन होईल, जिल्ह्यात 144 कलम यापुढेही कायम आहे,’ असं जिल्हाधिकारी सिंघला यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments