Ticker

6/recent/ticker-posts

कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर पोंभूर्णा कृषी विभाग व संजीवनी बचत गटाचा उपक्रम

कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर 
     पोंभूर्णा कृषी विभाग व संजीवनी बचत गटाचा उपक्रम

पोंभूर्णा ,
    कोरोणा विषाणू  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावो गावी कृषी केंद्रावर कृषी निविष्ठा खरेदी करिता होणारी गर्दी टाळण्याकरिता व शेतकऱ्यांना वेळेत, सुव्यवस्थित रित्या, खते, बी बियाणे, कीटकनाशके  मिळावीत यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार पोंभूर्णा तालुका कृषी अधिकारी व शेतकरी गट यांच्या समन्वयातून चेक आंबेधानोरा येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हिरवा झेंडा दाखवीत पंचायत सभापती अल्का आत्राम यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठा वाटप करण्यात आल्या.
      त्यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत नीमोड, कृषी मंडळ अधिकारी श्री. पी एन. बारामते ,  कृषी पर्यवेक्षक श्री. एस. वी. पहापळे,   कृषी सहायक वी.एन. जीवरंग सह आदी शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
       त्यात संजीवनी शेतकरी बचत गट चेक अंबेधानोरा यांनी  एकूण बारा  सदस्यांची 20:20:0:13 खताची 150 बॅग, (7.50 मे. टन ) १४७००० हजार रुपयाची एकत्रित खरेदी गट प्रमुख प्रकाश काजपवार यांचे द्वारे वितरित करण्यात आली.  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बचत गटाच्या माध्यमातून नोंदणी करून कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून खरेदी करने,  कंपनीचे नाव, लॉट नंबर, मूळ बिलाची रक्कम व वैधता तपासून घेणे अती आवश्यक असल्याचे उपस्थित तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत नीमोड पोंभूर्णा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनातून सांगितले.

Post a Comment

0 Comments