Ticker

6/recent/ticker-posts

अवैध दारू विक्री तेजीत, सर्वांना संचारबंदी त्यांना मात्र संधी

अवैध दारू विक्री तेजीत, सर्वत्र संचार बंदी, मात्र दारू विक्रेत्यांना संधी? पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
पोंभुर्णा
वैनगंगा न्यूज नेटवर्क
      सर्वत्र जनसंचार बंदी असतानाही मात्र अवैध दारू विक्रेत्यांना संचार बंदीतून सूट देण्यात आली आहे की काय? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. कारण अवैध दारू परिसरात सर्वत्र उपलब्ध होत असल्याने दुप्पट तिप्पट दर देऊन तळीरामांना आपली शौक पूर्ण करावी लागत आहे.
     चामोर्शी तालुक्यातील लखमापुर बोरी येथे वीस ते पंचवीस अवैध दारू विक्रेते धंदा करतात. या तालुक्यातून वैनगंगेच्या पात्रातून जुनगाव मार्गे पोंभूर्णा तालुक्यात या बनावट दारूचा शिरकाव होतो. चामोर्शी पोलीस अवैध दारू विक्रेत्यांना जेरबंद करण्यास अयशस्वी ठरत आहे. किंबहुना त्यांचेच पाठबळ दारू विक्रेत्यांना मिळत आहे. त्यामुळेच हा जीवघेणा दारूचा धंदा राजरोसपणे फोफावत आहे. याबाबत चामोर्शी पोलिसांना माहिती दिली असता ते दारू विक्रेत्यांची झाडाझडती घेतात धाळी टाकतात. दुसऱ्या दिवशी मात्र परिस्थिती जैसे थे पहावयास मिळते. व पकडून नेलेले आरोपीही मोकाट फिरताना व दारू विकताना दुसऱ्याच दिवशी दिसतात. नुकताच काही दिवसापूर्वी बोरी येथे होलसेल दारू पुरवठा करणारा विजय नयापती याचेवर धाड टाकून शेकडो लिटर दारू वाहनासह जप्त केली. मात्र तेच वाहन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच दारू आल्याच्या हातात दिसली. याचा अर्थ पोलिसांचे दारू वाल्यांची साटेलोटे आहेत. दारू पकडणे व आर्थिक देवाण-घेवाण करून आरोपीला मोकाट सोडून देणे असे कार्य पोलीस विभाग करीत असल्यामुळे चामोर्शी तालुक्यात बनावटी दारुचा पूर वाहत आहे. त्याचा फटका सीमावर्ती तालुक्यांना बसत असून संचारबंदी चाही फज्जा उडत आहे. वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष केंद्रित करून दारूला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. व बनावटी दारू पिऊन अनेकांचे संसार उध्वस्त झालेले वाचवावे.

Post a Comment

0 Comments