Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळा -विजय ढोंगे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस *पोंभुर्णा तालुक्यात शेकडो ट्रॅक्टर रेती वाहतूकीला अभय कुनाचे

अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळा -विजय ढोंगे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 
अशाप्रकारे तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना नासवून सोडण्यात आले आहे.

वैनगंगा न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा:संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असताना गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्व शासकीय यंत्रणा यावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी रस्त्यावर उतरली आहे. मात्र, पोंभुर्णा शहरात व तालुक्यात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीचे तीन-तेरा वाजवत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवैध वाळूची सर्रास वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातून शासनाला लाखोचा चुना लागत असल्याने, महसूल विभागाच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोंभुर्णा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला उधाण आले असून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर च्या माध्यमातून शेकडो ट्रॅक्टर रेती चोरल्या जात आहे यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. याला प्रशासनाने वेळीच आळा घालावा व रेती तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
 तालुक्यात पोंभुर्णा स्मशानभूमी, वेळवा ,थेरगाव ,गगनगिरी, जामखुर्द, देवाडा,जुनगाव या नदी  पात्रातून रात्रभर शेकडो ट्रॅक्टर रेती वाहतूक होते. सध्या दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कोरोनाचे संकट आहे कोरोना महामारीने जगाला हादरवून सोडले आहे. परंतु पोंभुर्णा तालुक्यात  सोशल डिस्टंसींग चे नियम धाब्यावर बसवल्या जात आहेत. तालुक्यात व शहरात रात्रीच्या वेळेस राजकीय पुढाऱ्यांचे चेले चपाटे टू व्हीलर घेऊन बिनधास्त फिरतात त्यांना खुली सूट  दिली असल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसाला घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. परंतु येथे वाळू चोर मात्र रात्री बेरात्री खुलेआम फिरतात. यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही बाहेरगावचे ट्रॅक्टर्स हे पोंभूर्णा येथील एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने चालू आहे. त्या सर्व ट्रॅक्टर रेती चोरांवर  कडक कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही..

पोंभुर्णा तालुक्यात घरकुलांची कामे चालू आहेत अशातच रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे बैलबंडी ने रेती वाहतूक चालू होती. परंतु त्यांच्यावर अन्याय करत येथील एका राजकीय नेत्याने आपल्या ट्रॅक्टर चालवण्यासाठी अवैध रेती वाहतुकीला पाठबळ दिले आहे. त्यामुळे हजारो बैलबंडी धारकांना बेरोजगार होण्याची पाळी आली. म्हणून ट्रॅक्टरने होत असलेली अवैध वाळू वाहतूक बंद करून पुनश्च बैलबंडी ने वाळूची वाहतूक सुरू करावी जेणेकरून  तालुक्यातील हजारो बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल.
       पोंभुर्णा तालुक्यात सुरू असलेले अवैद्य वाळू वाहतुकीला शासनाने लगाम लावावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय  ढोंगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments