Ticker

6/recent/ticker-posts

collector l vardha l Maharashtra lवर्धा चे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत



वर्धा: जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले साहेब यांचे जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे आज दि.०१/०९/२०२२रोजी स्वागत करून सामाजिक विविध विषया वर केली चर्चा*. *१)* दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी पवनार येथे गेलो असता *सेवाग्राम - पवनार विकास आराखड्या च्या विकास निधीतून **गणपती विसर्जन* कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे.

आता गणपती बाप्पाची स्थापना झाली असून एक दिवसाचा गणपती, अडीच दिवसाचा गणपती विसर्जनास सुरुवात झाली आहे.सदर कुंडातील साठऊन असलेले पावसाचे पाणी हिरवे कंच होते.त्या पाण्याचा उपसा करून परत स्वच्छ पाणी कुंडात भरण्या बाबत चर्चा करण्यात आली. 

*२)* त्याच बरोबर पवनार येथील धाम नदी तिरावरील अतिशय प्राचीन पुरातत्व नंदिखेडा देवस्थान परिसरातील जागृत नंदी व ज्योतिर्लिंग असलेल्या शिव मंदिराचा पवनार विकास आराखड्यात समावेश करून शिव मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडप बांधकाम बाबत चर्चा करण्यात आली.

*३)* त्या सोबत आम्ही वर्धा जिल्हा प्रशासनाकडे मांडलेल्या **गाव तिथे अभ्यासिका* या प्रस्तावा बाबत चर्चा करून निधी कसा उपलब्ध करून देता येईल आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतने रूम उपलब्ध करून दिली तर तिथे मुलांच्या अभ्यासा साठी अभ्यासिका सुरू करण्यास १० नग टेबल,१०नग बेंच, २नग पुस्तकं ठेवण्यासाठी लोखंडी कपाट, ३० ते ४० हजार रुपयाची पुस्तके, या अभ्यसिके च्या माध्यमातून उपलब्ध होईल का....? अशा अनेक मुद्द्यांवर जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले साहेब आणि जिल्हा परिषद वर्धा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन ओंबसे साहेब यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 फिनिक्स ॲकडमी चे संचालक श्री.नितेश कराळे सर, पवनार येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव हिवरे, मोहित साहारे, गोविंदा पारीसे, इम्रान भाई इत्यादी लोकांच्या शिष्ट मंडळांनी चर्चा केली.

Post a Comment

0 Comments