Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील दलितांची रणरागिनी सुषमाताई अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेनेला मिळणार बळकटी




जनवार्ता भारत:शिंदे यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरु होतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शाहू- फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे यांनी शिवबंधन बांधलं. 

यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पक्षात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना उपनेतेपदाचं गिफ्ट देखील मिळालं आहे. प्रवेशावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments