जनवार्ता भारत डॉट कॉम
चंद्रपूर: जिल्हयामध्ये विकासाची गंगा प्रवाहीत करणारे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन लखमापूर स्थित हनुमान मंदिराचे सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतीचा भुमीपूजन सोहळा दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सायं. ४.३० वा. लखमापूर हनुमान मंदिर परिसर लखमापूर येथे संपन्न होतो आहे.
आ. सुधीर मुनगंटीवर यांच्या प्रयत्नातुन लखमापूर येथे १५ हजार स्वॉअर फुट जागेवर ६० लक्ष रू. खर्चुन सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतीचे बांधकाम शासनाच्या लेखाशिर्ष २५१५ या मुख्य योजनेतुन होते आहे. चंद्रपूर जिल्हयातील अनेक विकासाची कामे झाली असून अनेक कामे प्रगती पथावर आहे. चंद्रपूर जिल्हयाचा चेहरा-मोहराच विकासाने बदलवून टाकण्याचा प्रण आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले, प्रदेश सचिव अनिल डोंगरे, तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, माजी जि.प. सदस्या रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी पंचायत समिती सभापती केमा रायपुरे, लखमापूर हनुमान मंदिर कमेटी अध्यक्ष सुरेश शर्मा उपस्थित राहतील. या भुमीपूजन सोहळयाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर च्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments