Ticker

6/recent/ticker-posts

शारीरीक संबंधादरम्यान ६१ वर्षीय प्रियकराचा मृत्यू! प्रेयसी चाळिशीतील...




मुंबई : प्रियकर आणि प्रेयसी लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवताना त्यांच्यासोबत मोठी दुःखद घटना घडली. शारीरीक संबंध ठेवत असताना प्रियकराचा मृत्यू झाला. मुंबईतील कुर्ल्यात ही घटना घडली.

६१ वर्षीय प्रियकराचा मृत्यू
प्रियकर आणि प्रेययी शारीरीक संबंध ठेवत असताना ही धक्कादायक घटना मुंबईतील कुर्ला परीसरातील एलबीएस रस्त्यावर जीएसके हॉटेलमध्ये घडली. प्रियकराचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच हॉटेलमधील कर्मचार्‍यांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा पोलीस करत आहेत. मृताच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा आढळून आलेले नाहीत. मृताचे वय हे ६१ वर्ष आहे तर त्याच्या प्रेयसीचे वय हे ४० वर्ष आहे.

*रुग्णालयात हलवण्यापूर्वी प्रियकराचा मृत्यू*
जीएसके हॉटेलमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत सोमवारी सकाळच्या सुमारास चेक इन केलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांनी लैंगिक संबंध ठेवल. मात्र यावेळी त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. लैंगिक संबंधादरम्यान, या पुरुषाला अस्वस्थ वाटू लागलं आणि संभोग करताना तो बेशुद्ध झाला. यावेळी प्रेयसी घाबरली आणि तिने हॉटेलमधील कर्मचार्‍यांना याबाबत कळवलं. यानंतर या पुरुषाला सायन रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृताची प्रेयसी ही वरळी कोळीवाड्यात राहणारी आहे. ती एका खाजगी कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

साभार.....

Post a Comment

0 Comments