Ticker

6/recent/ticker-posts

*शाब्बास मिटकरीजी* *हिंदूंचे डोळे उघडले*

*शाब्बास मिटकरीजी*
*हिंदूंचे डोळे उघडले*

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी सांगली येथील भाषणात मम भार्या समर्पयामि या संस्कृत मंञाविषयी जे बोलले ते शंभर टक्के खरे आहे.हिंदू लग्नात म्हटल्या जाणाऱ्या संस्कृत मंञाविषयी जाणून घेण्याचा विचार फारसा कोणी करीत नाही. त्यामुळे असल्या अपमानास्पद मंञाने लग्न लागते.
   मिटकरी यांनी विषय छेडल्याने ब्राह्मण पुरोहितांचे माथे ठणकले.प्रतिक्रिया म्हणून निषेध नोंदविला गेला.परंतु वैदिक  ब्राह्मण पुरोहितांनी पाडलेल्या चालीरीती,प्रथा,परपंरा इतक्या विकृत आहेत की, त्याला समाजजीवनात पसरविलेली घाण यापेक्षा दुसरा शब्द नाही.
   हिंदूंच्या लग्न पध्दतीचा मिटकरी यांचा विषय समोर नेऊन बऱ्याच गोष्टी सांगता येतील.त्याच्या माहितीसाठी बाबासाहेबांच्या क्रांती- प्रतिक्रांती या ग्रंथाचा आधार महत्वाचा आहे. लग्नात घातल्या जाणाऱ्या सप्तपदीमागे वैदिक ब्राम्हणांच्या कामवासनेचा इतिहास आहे.आर्यात देव नावाचा विशेष लोकांचा वर्ग होता.तो पराक्रम व पद प्रतिष्ठेने मोठा मानला जात असे.उत्तम संतानोत्पत्तिकरीता आर्य लोक अशा देवांकडे आपल्या स्ञियांना ठेवीत असत.या प्रथेचे प्रचलन इतके होते की, देव लोक कुठल्याही आर्य स्ञीशी सहवास करण्याला आपला अग्रहक्क मानीत होते.यामुळे कुठल्याही स्ञीला तोपर्यंत लग्न करता येत नसे जोपर्यंत ती देवांच्या पूर्वस्वादनाच्या अधिकारापासून मुक्त होत नसे.याला अवदान म्हणत.सप्तपदी याचा अर्थ वराचे वधुशी सात पावलं चालत जाणे.जर एखादा देव एखाद्या स्ञीशी यौनसंबंधाबाबत असंतुष्ठ असल्यास त्या स्त्रीला सात पावलं चालण्याच्या अगोदर तो तिच्यावर पूर्वस्वादनाचा आपला हक्क सांगू शकत असे. सातफेऱ्यानंतर माञ देवाचा हा अधिकार संपत असे.हे सात फेरे संपल्यानंतर ती स्त्री विवाहबद्ध झाल्याचे मानण्यात येई. हा किळसवाणा इतिहास जाणल्यानंतर कोणता शहाणा मनुष्य अशा विकृत प्रथेला मान्यता देईल. बहुजनांत ही प्रथा सुरू राहाण्यामागे फार मोठे अज्ञान आहे.
  मिटकरी यांना जे सत्य माहित आहे,ते त्यांनी बहुजनांच्या हितासाठी त्यांच्यासमोर ठेवले. ब्राम्हण संघटनांनी त्याचा विरोध करण्याऐवजी हे सत्य स्वीकारायला हवे.मिटकरींनी हिम्मत केली.माञ बहुजनांना जागृत करणारे त्यांच्यासारखे इतरही समोर यायला हवेत.

*जोगेंद्र सरदारे*
संपादक लोकवाक्य

Post a Comment

0 Comments