Ticker

6/recent/ticker-posts

बिबट्याचा शेळीवर हल्ला: हल्ल्यात शेळी ठार


शंकरपुर :-चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या आणि मानवी जिवांचा अत्यंत भयंकर संघर्ष सुरू आहे. चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथे गावाशेजारी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गावातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होताच शेवटच्या टोकावर असलेल्या घरासमोरील अंगणात बांधलेल्या शेळीवर हल्ला चढवून ठार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार, पशुपालक उद्धव नामदेव हजारे यांनी सायंकाळी शेळीला अंगणात नेहमीप्रमाणे बांधून ठेवले व आपले कामे करण्यासाठी निघून गेले. दरम्यान वादळी वाऱ्यासह गावात पाऊस बरसल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे घरातील मंडळी ही आतमध्ये होती. रात्रीच्या वेळी बिबट्या गावालगत फिरत होता. याच दरम्यान त्याची नजर बांधलेल्या शेळीवर पडली. आणि दबा धरून बसलेल्या बिबट्याने वीज पुरवठा खंडित होताच क्षणातच संधी साधून घरासमोर बांधलेल्या शेळीवर हल्ला चढवला. यात शेळी जागीच ठार झाली. तिच्या ओरडण्यामुळे घरातील मंडळी बाहेर येताच बिबट्याने शेतशिवाराकडे धूम ठोकत पळून गेला. सदर घटनेची माहिती वनरक्षक श्रीकृष्ण नागरे यांना दिली. 24 एप्रिलला सकाळी आपल्या चमुसोबत येऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेमुळे गावात दहशत निर्माण झाली असून गावात वाघ, बिबट्याचा शिरकाव होत असल्याने रात्री घराबाहेर पडणे लोकांनी बंद केले आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यानी केली आहे.

Post a Comment

0 Comments