*◾एन टी प्रवर्गातील अतिशय गरजू घरकुल लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी तालुका काँग्रेसची बैठक:*
पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
पोंभूर्णा तालुक्यातील एन टी प्रवर्गातील घरकुल योजनेसाठी अतिशय गरजू लाभार्थ्यांची व अपंग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल वितरित करण्यासाठी यादी तयार करण्याच्या विषयावर चर्चा करून याद्या तयार करण्यासाठी पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीने एका बैठकीचे आयोजन केले आहे.दिनांक ०६ एप्रिल २०२२ रोज बुधवार ला दुपारी एक वाजता काँग्रेस कार्यालय पोंभुर्णा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला तालुक्यातील काँग्रेस कमिटी चे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस समर्थीत सरपंच, सदस्य यांनी आपापल्या क्षेत्रातील गरजू लोकांच्या याद्या घेऊन सदर बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष कडूजी कुंदावार यांनी केले आहे.


0 Comments