Ticker

6/recent/ticker-posts

*🚨अखेर नांदगाव चे माजी सरपंच मंगेश बागलुर वाघ व सचिव उत्तम बावनथडे यांची तुरुंगात रवानगी* *🔮जनसुविधा योजनेतील गैरप्रकार आले अंगलट: लाखोंचा केला गैरव्यवहार*




पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
      मूल तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणारी नांदगाव ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी चर्चेत राहते. मागील अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीने जनतेच्या अनेक सोयीसुविधा समुद्रात डूबवल्या, असा आरोप येथील नागरिक सतत करत असतात. अशाच एका आरोपात माजी सरपंच व माजी ग्रामसेवक हे दोघेही जनसुविधा योजनेच्या गैरप्रकारात अडकल्याने यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. कारवाईच नव्हे तर सरळ सरळ तुरुंगात रवानगी झाली आहे.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव येथील सरपंच मंगेश शशिकांत मगनुरवार व सचिव उत्तम बावनथडे यांच्यावर जनसुविधा योजनेतील निधी हडप केल्याचा आरोप आहे. जवळपास 38 लाखांपेक्षाही जास्त निधीचा अपहार झाल्याची तक्रार विद्यमान सरपंच हिमानी वाकुडकर यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीवर संवर्ग विकास अधिकारी मुल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चौकशी करून तत्कालीन सरपंच मंगेश मगनुरवार व सचिव उत्तम बावनथडे यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांची नुकतीच तुरुंगात रवानगी केली असल्याची माहिती मुल पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री दशरथ वाकुडकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे.
     विद्यमान सरपंच हिमानी वाकुडकर यांच्या तक्रारीनुसार झालेल्या चौकशीअंती तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून माजी सरपंच मगनुरवार तत्कालीन ग्रामसेवक बावनथडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात सचिव बावनथडे यांना पोलिसांना शरण यावे लागले होते हे विशेष.
       सन 2020 2021 या वित्तीय वर्षात शासनाच्या जन सुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत भवन व स्मशानभूमी बांधकामासाठी 30 लाखांचा निधी ग्रामपंचायतीला उपलब्ध झाला होता. सदर बांधकामासाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली होती. परंतु प्राप्त निधीतून कोणतेही बांधकाम न करता निधीची परस्पर उचल केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे व सदर गैरप्रकार ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या तोंडावर ,बावीस लाख चार हजार 846 रुपये उचल केलेले आहे. सदर गैरप्रकारात व कारवाईत तथ्य आढळून आल्यामुळे माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक या दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. यामुळे नांदगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे. सरपंच आणि सचिव तुरुंगात जाणे जिल्ह्यातील अशी ही पहिलीच घटना असावी अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

Post a Comment

0 Comments