Ticker

6/recent/ticker-posts

महाकाली वॉर्ड चंद्रपूर येथे जागतिक महिला दिन संपन्न



चंद्रपूर:-सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित स्वर्गीय सुशिलाबाई  रामचंद्रराव मामिडवार  कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपुर महिला अध्ययन व सेवा केंद्र  विभागातर्फे  महाकाली वॉर्ड येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील साकुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकात्मिक बाल विकास सेवा शहरी प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्र १, महाकाली गुरुमाऊली नगर च्या अंगणवाडी सेविका  संगीता गौरखेडे   समुदायातील महिला , महाकाली कन्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शन अंगणवाडी सेविका गौरखेडे यांनी स्त्रीशिक्षणातून स्त्री शक्तीला प्रज्वलित करणाऱ्या   क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा देत महिला स्वावलंबी व सक्षमीकरण यावर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व सूत्रसंचालन रेखा घोगरे व आभार प्रदर्शन सुनीता वाच्छामी हिने केले.  कार्यक्रमात महिलांनी गीत गायन केले. महिलांनी स्वतःचे मनोगत व्यक्त करून उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. तसेच सदर कार्यक्रम सुशीलाबाई रामचंद्रराव  मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क च्या मार्गदर्शिका प्रो. डॉ. ममता ठाकूरवार मॅडम यांच्या पर्यवेक्षनाखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमात एस आर एम कॉलेजचे  विद्यार्थी  रेखा घोगरे , सुनीता वाच्छामी, अंकुश खडसे ,  अनमोल जांभुळे , चेतन गोडाम , अक्षय निलमवार यांनी सहकार्य करून  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Post a Comment

0 Comments