Ticker

6/recent/ticker-posts

*मार्कंडादेव व चपराळा यात्रा यावर्षी होणार आमदार डॉ. देवराव होळी यांची माहिती*




जिल्हा प्रतिनिधी: गडचिरोली
        विदर्भाची काशी म्हणून संपूर्ण राज्यभरात ओळख असलेल्या मार्कंडादेव आणि चपराळा येथील महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रा नियोजित वेळी होतील अशी माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
      या बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद,मार्कंडा देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन जी भांडेकर, मार्कंडा बस चपराळा देवस्थान समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक आणि अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
      कोरोना-या महामारी मुळेमागील दोन वर्षापासून यात्रा होऊ शकली नाही मात्र यावर्षी यात्रा व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आणि आग्रह असल्याचे आमदार देवराव होळी यांनी या बैठकीत बोलून दाखवले.सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा आदर करत सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी या यात्रांनामंजुरी दिली असून जिल्ह्यातील जनतेत या निर्णयावर आनंद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments