Ticker

6/recent/ticker-posts

*'मृत्यूनंतर आत्माही जिवंत राहत नाही; तज्ज्ञाचा खळबळजनक दावा*

*'मृत्यूनंतर आत्माही जिवंत राहत नाही; तज्ज्ञाचा खळबळजनक दावा*

*जनवार्ता भारत डॉट कॉम*

मृत्यूनंतर नेमकं काय होतं, याबाबत एका तज्ज्ञाने नवी माहिती दिली आहे.
मृत्यूनंतर नेमकं काय होतं, याबाबत एका तज्ज्ञाने नवी माहिती दिली आहे.
मृत्यूनंतर नेमकं काय होतं, याबाबत एका तज्ज्ञाने नवी माहिती दिली आहे.
मुंबई, 10 फेब्रुवारी : जन्म (Birth)आणि मृत्यूबद्दल (Death) जगात अनेक प्रकारच्या समजुती आहेत. प्रत्येक धर्मात (Religion) माणसाच्या मृत्यूनंतरचा प्रवास (Journey after death) आपापल्या परीने सांगण्यात आला आहे. मृत्यूनंतर मानवी शरीरात नेमके काय होते याविषयी विज्ञान (Science) आणि धर्म (Religion) यांच्यात नेहमीच वाद होत आला आहे. आत्मा किंवा चैतन्य शरीरात राहतो की तो शरीर सोडून दुसऱ्या प्रवासाला निघून जातो? यावर हजारो वर्षांपासून चर्चा होत आहे. विज्ञान आणि धर्म हे दोन्ही पक्ष आपाआपल्या तर्कांवर ठाम आहेत. आता एका कॉस्मोलॉजिस्ट (Cosmologist) म्हणजे विश्वाचा किंवा ब्रम्हांडाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाने (Cosmologist Weird Claim) याबाबत एक धक्कादायक दावा केला आहे.

कॉस्मॉलॉजिस्ट डॉ. सीन कॅरोल (Dr. Sean Carol) यांनी असा दावा केला आहे की जगात सर्व काही विज्ञानाच्या नियमांनुसार घडत असेल तर भौतिकशास्त्रानुसार (Physics) मृत्यूनंतर कोणतेही जीवन अशक्य आहे. भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यात आपलं सगळं आयुष्य घालवणाऱ्या डॉ. सीन कॅरोल यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यातील चैतन्य किंवा आत्मा (Soul) या विश्वात राहू शकत नाही.

Lips Care Tips: काळे पडलेले ओठ चेहऱ्याचं सौदर्य घालवतात; या चुकीच्या सवयी ताबडतोब बदला


सायंटिफिक अमेरिकनमध्ये (Scientific American) या विषयावर लिहिताना डॉ. कॅरोल यांनी म्हटले आहे की, ' शरीराच्या (Body) मृत्यूनंतर,आपली चेतना किंवा आत्मा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात राहतो, असा दावा केला जातो. मात्र भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार हे शक्य नाही. आपले दैनंदिन जीवन भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार चालते. त्यानुसार असा कोणताही मार्ग नाही, जो मृत्यूनंतर आपल्या मेंदूमध्ये (Brain) असलेली माहिती टिकवून ठेवतो. अणू किंवा अन्य वैज्ञानिक शक्ती आपल्याला ज्ञात आहेत. मात्र मृत्यूनंतर आपल्या मेंदूमध्ये असलेली माहिती टिकवून ठेवतो असा कोणताही मार्ग अद्याप आढळलेला नाही मृत्यूनंतरही आत्मा जिवंत राहू शकेल असा कोणताही मार्ग नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप अन्य शास्त्रज्ञांनी डॉ. सीन यांच्या मताला दुजोरा दिलेला नाही. या तर्काच्या आधारे मानवी मेंदूचा अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे, असं त्यांचे म्हणणे आहे.

धर्मग्रंथामध्ये शरीराप्रमाणे आत्मा किंवा चैतन्य हे नश्वर मानले जात नसल्याने डॉ. सीन यांच्या या दाव्याने वाद निर्माण होणार आहे. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो, असे मानले जाते. हिंदू धर्मशास्त्र (Hindu Religion) असो वा ख्रिश्चन धर्मातील श्रद्धा आत्म्याबाबत समान मत आहे. डॉ. सीन यांनी असंही म्हटलं आहे की, ते देवावर विश्वास न ठेवण्याबाबत काहीही सांगत नाही आहेत, मात्र आतापर्यंतच्या वैज्ञानिक विश्वासांपेक्षाही आत्म्याबाबतचे त्यांचे हे मत खूप वेगळे आहे.


(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. जनवार्ता भारत डॉट कॉम त्याची हमी देत नाही.)

साभार.....

Post a Comment

0 Comments