Ticker

6/recent/ticker-posts

*सेंद्रिय निविष्ठा डेमो युनिट व त्यांचे विक्री केंद्राचे लोकार्पण.*


*सेंद्रिय निविष्ठा डेमो युनिट व त्यांचे विक्री केंद्राचे लोकार्पण.*

पोंभूर्णा:- उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा निर्माण करून शेतकऱ्यानं पर्यंत कमी दरात पोहचवून सेंद्रिय शेती ला अधिक चालना मिळावी या उद्देशाने सेंद्रिय निविष्ठा निर्माण युनिट व त्याच्या विक्री केंद्राचे आज रोजी 28/01/2022 ला उद्घाटन करण्यात आले व सेंद्रिय शेती गटातील महिलांना स्कोप सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.
हरितक्रांती महिला सेंद्रिय शेती गट देवाडा खुर्द  च्या माध्यमातून सेंद्रिय शेती गटात असलेल्या महिलांमार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उदघाटन  मा.सो.ज्योतीताई बुरांडे उपसभापती  पंचायत समिती पोंभूर्णा, श्री.नीमोड सर तालुका कृषी अधिकारी,श्री. बारापत्रे सर मंडळ कृषी अधिकारी पोंभूर्णा यांच्या  हस्ते करण्यात आले .
  या युनिट मध्ये गांडूळ खत, दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र, निंबोळी अर्क, निमास्त्र, वेस्ट डी कंपोझर, अझोला, लेंडी खत, कामगंध सापळे, लुर, चिकट सापळे इ निर्माण करण्यात येत आहे. उमेद मार्फत नाविन्यपूर्ण कामे करण्यात येत असून महीलां द्वारे सेंद्रिय निविष्ठा निर्मित करण्याचा हा प्रकल्प महिला व शेतकऱ्यांनसाठी वरदान ठरेल व नियमित निविष्ठा निर्माण करावेत असे मार्गदर्शन उपसभापती मॅडम यांनी केलेत.
       तसेच सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून जास्तीस जास्त शेतकऱ्यांनी याकडे वळून आरोग्यावर होणारे   रासायनिक खताच्या दुष्परिणामापासून स्वतःचे स्वरक्षण करावेत असे मत मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन करतांना उपस्थित सर्व महिलांना समजावून सांगितले. 
         उमेद अभियान हे प्रत्येक कुटंबाला विकासाकडे घेवून जाण्यासाठी कार्यरत असून महिलांनी या कडे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणारे  साधन म्हणून बघावेत असे मत श्री. राजेश दुधे , तालुका अभियान व्यवस्थापक यांनी व्यक्त केले. उमेद अभियान अंतर्गत  सदरील सेंद्रिय निविष्ठा विक्री केंद्रामधून तालुक्यातील शेतकऱ्यांना जैविक किटनाशके व खते तालुक्यातच उपलब्ध होत असून स्वस्त दरात उपलब्ध आहे. रासायनिक खत आणि कीटकनाशके यांचा बेसुमार वापर यामुळे जमिनीचे आरोग्य,मानवी आरोग्यावर, पर्यावरण यावर अनिष्ट परिणाम होत असून शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे सेंद्रिय निविष्ठा चा नियमित वापर केल्यामुळे जमिनीचे, मानवी आरोग्य चांगले राहते पर्यावरण छान राहते एकूणच उत्पादन खर्च सुद्धा कमी लागतो. सेंद्रिय निविष्ठा विक्री केंद्र मुळे शेतकरयामध्ये जागृती होऊन सेंद्रिय शेतीस नक्कीच चालना मिळेल असे मत श्री.संघर्ष रंगारी , प्रभाग समन्वयक, सेंद्रिय शेती यांनी व्यक्त केले.   
  सदर कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचारी   व  उज्वल प्रभागसंघाच्या सचिव सौ. भडक ताई , लोकल ग्रुप , उत्पादक ग्रुप च्या महिला , कृषी ,पशु सखी ,उद्योग सखी, CTC, CLFM,पशु व कृषी व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री.बंडु लेंनगुरे प्रभाग समन्वयक  व आभार प्रदर्शन श्री.संघर्ष रंगारी प्रभाग समन्वयक - सेंद्रिय शेती यांनी केले.

Post a Comment

0 Comments