Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक आमदार हा शिक्षकांच्या हक्कासाठी सदैव कार्यरत असला पाहिजे -- आ. नागो गाणार.



 जुनी पेशंन योजना हा ज्वलंत विषय आहे.या सदंर्भात माझा लढा सुरु आहे.शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.जुनी पेशंन योजना जोपर्यंत लागु होत नाही तोपर्यंत मि आमदारकीची पेशंन घेणार नाही.शिक्षक आमदार हा शिक्षकाच्या हक्कासाठी सदैव कार्यरत असला पाहिजे असे मत आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले.   महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर ( ग्रामिण)चे जिल्हा अधिवेशनाचे आयोजन पोंभुर्णा येथे राजराजेश्वर सामाजिक सभागृहात दिनांक ४ आणि ५ जाणेवारीला करण्यात आले होते.५ जानेवारी ला अधिवेशनाच्या ऊद्दघाटन प्रसंगी ऊद्दघाटक म्हणून त्यांनी आपले मत व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष -  के.के.बाजपेयी विभाग अध्यक्ष , स्वागताध्यक्ष - श्वेता वनकर नगराध्यक्षा नगरपंचायत पोंभुर्णा , प्रमुख अतिथी - राधेश्याम पंचबुध्दे विभाग ऊपाध्यक्ष ,विनोद पांढरे विभाग ऊपाध्यक्ष , प्रकाश चुनारकर सहसरचिटणीस प्रांत ( प्राथमिक ) , अल्का आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा ,सुभाष गोतमारे  नागपुर शहर अध्यक्ष , शेद्रे सर कोषाध्यक्ष नागपुर विभाग , सुनिता दिलीप मॕकलवार नगरसेविका नगरपंचायत पोंभुर्णा ,एकनाथ थुटे बोर्ड मेंबर नागपुर , मधुकर मुप्पीडवार जिल्हाध्यक्ष (माध्यमिक ) ,विलास बोबडे जिल्हाध्यक्ष (प्राथमिक ) ,रामदास गिरटकर कार्यवाह (माध्यमिक ) , अमोल देठे कार्यवाह (प्राथमिक ) ,दिलीप मॕकलवार अधिवेशनाचे संयोजक तथा जिल्हासहकार्यवाह आदि मान्यवर मंचावर ऊपस्थित होते.  प्रारंभी विद्येची माता स्वरस्वती , आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण तथा दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे ऊद्दघाटन करण्यात आले.  जनता विद्यालय पोंभुर्णा पोंभुर्णा येथील मुलींची चमु आणि सोनुले सर यांनी सुदंर स्वागत गितांनी पाहुण्यांचे स्वागत केले.  आमदार गाणार म्हणाले कायदा बादलल्याशिवाय शिक्षक योजना अमंलात येत नाही, सभागृहात मि नेहमीच शिक्षकांचे प्रश्न लावुन धरत असतो.लोकशाही पध्दतीचा वापर करतो. शिक्षकांचा सन्मान झालाच पाहिजे ,शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहीजे. संबंधितावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. दिवसेंदिवस शासन विविध निर्णय काढत असते त्यामुळे शिक्षकांनी सुध्दा जागृत असले पाहिजे . शिक्षंकानी संघटनेच्या पाठिशी असले पाहिजे . आर्थिक पाठबळ दिले पाहिजे ,संघटनेला मजबुत करा. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी याकरिता माझा संघर्ष सुरु आहे . माझी भुमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. मि सदैव शिक्षकांच्या पाठिशी आहे.मि शिक्षकांचा प्रतिनिधी आहे.शिक्षंकानी चिंता ,मनातील भिती काढुण टाकावी. संघटना  तुमच्या पाठिशी आहे.संघटनेसोबत राहा .संघटनेची ताकद सरकारला दाखवा . असे मत शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले.  या कार्यक्रमात आमदार नागो गाणार , के.के.बाजपेयी ,श्वेता वनकर ,राधेश्याम पंचबुध्दे , विनोद पांढरे , प्रकाश चुनारकर ,अल्का आत्राम ,सुभाष गोतमारे , शेद्रे सर ,सुनिता मॕकलवार ,एकनाथ थुटे , मधुकर मुप्पीडवार ,रामदास गिरटकर ,विलास बोबडे ,अमोल देठे या मान्यवरांचा शाल ,श्रीफळ आणि अधिवेशनाचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी विनोद पांढरे ,अल्का आत्राम ,श्वेता वनकर ,राधेश्याम पंचबुध्दे ,एकनाथ थुटे यांनी ऊपस्थितांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष के.के.बाजपेयी म्हणाले संगठन शिवाय संघटना अधुरी आहे.कोणताही भेदभाव न करता संघटना वाढिकरीता लक्ष द्या.समस्या सोडविण्यासाठी लक्ष द्यावे . प्रामाणिकपणे काम करा . प्रामाणिकपणे काम केल्यानंतर विजय प्राप्त होतच असतो.श्रध्दा आणि सबुरी या प्रमाणे वागा. या तत्वाचा अंगीकार करा. तन ,मन , धनाने संघटनेच्या पाठिशी राहा.संघटनेला बळकट करा.आसे मत व्यक्त केले.   प्रारंभी जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर यांनी संघटनेचे गित सादर केले. त्यानंतर प्राथमिक विभागाचे अहवाल वाचन अमोल देठे तर माध्यमिक विभागाचे अहवाल वाचन रामदास गिरटकर यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक - जिल्हाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार , संचालन - महिला आघाडी प्रमुख - संध्या गिरटकर  तर आभार प्रदर्शन - अधिवेषनाचे संयोजक तथा जिल्हा सहकार्यवाह  - दिलीप मॕकलवार यांनी केले. या अधिवेशनाला जिल्हापरिषद,नगरपरिषद , खाजगी अनुदानीत ,विनाअनुदानीत ,आश्रमशाळा ,काॕन्व्हेंट,  प्राथमिक ,माध्यमिक येथील मुख्याध्यापक ,शिक्षक  तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. अधिवेशनाची सांगता पसायदानाने झाली.

Post a Comment

0 Comments