ब्रम्हपुरी: प्रतिनिधी,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, (पुणे)अंतर्गत शिक्षक दिनाचे औचित्य साधून, समतादूत रज्जूताई मेंधुळकर व वर्षा कारेंगुलवार यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी केली.
सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचा भाषण घेण्यात आले. समतादूत वर्षा कारेंगुलवार व रज्जूताई मेंधुळकर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या व्यक्तिमत्त्व वर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना स्वावलंबी कसे बनता येईल हे मार्गदर्शनाखाली समजवून सांगितले. व नंतर कॉलेजच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे , एच .के. बगमारे मॅडम, सुभाषचंद्र खोब्रागडे व गोवर्धन दोनाडकर यांच समतादूत मार्फत पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.


0 Comments