प्रतिनिधी: शेतकऱ्यांना दर चार महिन्याला केंद्र शासनाद्वारे २ हजार रू. आपल्या खात्यावर जमा केले जातात, त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांची केवायसी म्हणजेच आधार जोडणी अनिवार्य केली आहे.
३१ ऑगस्ट ही केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख होती. परंतु ही मुदत शासनाकडून ७ दिवसासाठी वाढवून देण्यात आली आहे. ज्या शेतकरी बांधवांची अद्याप पर्यंत केवायसी पूर्ण झाली नाही अशा शेतकरी बांधवांनी दिनांक ७ सप्टेंबर पर्यंत केवायसी पूर्ण करून घ्यावी.
शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ७ सप्टेंबर नंतर कसलीही मुदत वाढ दिली जाणार नाही. शेतकऱ्यांनी सात सप्टेंबर पर्यंत किंवा नाही केली तरी यानंतर येणारा रुपये 2000 चा हप्ता शासनाकडून थांबवला जाणार आहे. अशी माहिती कृषी सहाय्यक गंगाधर गोणेकर यांनी दिली आहे.






0 Comments